पहिल्या महाराष्ट्र दौऱ्यासाठी उपराष्ट्रपतींचे मुंबईत आगमन

Uncategorized

संपादक मधुकर बनसोडे.

शहरातील श्री सिद्धिविनायक मंदिरात उपराष्ट्रपतींनी पूजा केली

आदित्य बिर्ला मेमोरियल पोलो कप’ अजिंक्यपद स्पर्धेला धनखड उपस्थित राहिले

उपराष्ट्र्पती जगदीप धनखड आणि डॉ. सुदेश धनखड यांचे आज मुंबईत आगमन झाले. उपराष्ट्रपतीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर धनखड यांचा हा महाराष्ट्र राज्याचा पहिला दौरा होता. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, राज्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा आणि इतर मान्यवरांनी मुंबई विमानतळावर त्यांचे स्वागत केले.

उपराष्ट्रपतींनी आपल्या मुंबई दौऱ्याची सुरुवात श्री सिद्धिविनायक मंदिरात पूजा करून केली . मंदिरात त्यांनी डॉ. सुदेश धनखड यांच्यासह देशाच्या समृद्धीसाठी आणि सर्व नागरिकांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली.आयोजित केलेल्या आणि आदित्य बिर्ला समूहाने प्रायोजित केलेल्या वार्षिक ‘आदित्य बिर्ला मेमोरियल पोलो कप’ अजिंक्यपद स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून धनखड उपस्थित होते . रोमांचक खेळ पाहिल्यानंतर त्यांनी खेळाडूंशी संवाद साधला आणि त्यांच्या खिलाडूवृत्तीचे कौतुक केले.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, फिक्की – आदित्य बिर्ला सीएसआर सेंटर फॉर एक्सलन्सच्या अध्यक्ष राजश्री बिर्ला , आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला, पिरामल समूहाचे कार्यकारी संचालक आनंद पिरामल आणि इतर मान्यवर या क्रीडा स्पर्धेला उपस्थित होते.

***