प्रतिनिधी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत पुणे जिल्हा अंतर महाविद्यालयीन मैदानी स्पर्धा दिनांक 17, 18 व 19 ऑक्टोबर 2026 रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मैदानावर पार पडल्या या स्पर्धेमध्ये एकूण 85 महाविद्यालयाने सहभाग नोंदविला या स्पर्धेमध्ये सोमेश्वर नगर येथील मु .सा. काकडे महाविद्यालयाने मुलांच्या गटाने सांघिक विजेतेपद मिळवले.
विजेत्या संघातील खेळाडू पुढील प्रमाणे मयूर येळे 21 किलोमीटर धावणे प्रथम क्रमांक ,कुणाल जाधव 21 किलोमीटर धावणे द्वितीय क्रमांक, सार्थक मोरे, सार्थक रणवरे, जगन्नाथ गडदरे, नवनाथ बरकडे, अभिषेक गार्डी, तुषार सोनवणे, संकेत होळकर ,यश भोसले या खेळाडूंनी आपापल्या क्रीडा प्रकारामध्ये उत्कृष्ट कामगिरी करून महाविद्यालयाला सांघिक विजेतेपद मिळवून दिले, त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. सतीशराव काकडे- देशमुख, नियोजन व विकास समितीचे अध्यक्ष मा. अभिजीत भैया काकडे- देशमुख यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.देविदास वायदंडे यांनी विजय खेळाडूंचे अभिनंदन करून भविष्यातील स्पर्धेसाठी त्यांना महाविद्यालयातर्फे जास्तीत जास्त क्रीडा सुविधा पुरविण्याचे आश्वासन दिले तसेच त्यांच्या समस्या जाणून घेऊन महाविद्यालयातर्फे त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
महाविद्यालयाचे सचिव श्री. सतीश लकडे यांनी देखील विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले खेळाडूंना प्रा. बाळासाहेब मरगजे व प्रा. दत्तराज जगताप यांचे मार्गदर्शन लाभले.
