• Home
  • इतर
  • लोकनेते गोपीनाथराव मुंडे  ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या विभागिय कार्यालयाचे परळीत उद्घाटन
Image

लोकनेते गोपीनाथराव मुंडे  ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या विभागिय कार्यालयाचे परळीत उद्घाटन

परळी वैजनाथ, प्रतिनिधी….
लोकनेते गोपीनाथराव मुंडे  ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या विभागिय कार्यालयाचे परळीत आज लोकनेते गोपीनाथराव मुंडे  ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या प्रादेशिक व्यवस्थापक जयश्री सोनकवडे- जाधव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले .
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागा अंतर्गत परळी वैजनाथ येथे लोकनेते गोपीनाथराव मुंडे  ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या विभागिय कार्यालय सुरु करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील महेश काॅम्प्लेक्स येथे हे कार्यालय सुरु झाले आहे. या अंतर्गत महामंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व योजनांचा लाभ उसतोड कामगार व कुटुंबांना देण्यात येणार आहे.नोंदणी करून उसतोड कामगारांना ओळखपत्राचे वाटप करणे, उसतोड कामगार पाल्यांसाठी वसतिगृह सुरु करणे, आरोग्यविषयक लाभ मिळवून देणे आदीबाबत कामकाजाला गती मिळणार आहे.

लोकनेते गोपीनाथराव मुंडे  ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाचे पुणे येथे राज्यस्तरीय तर परळी येथे प्रादेशिक कार्यालय असणार आहे. महामंडळातर्फे उसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी वसतिगृह आणि इतर योजना राबविण्यात येणार आहेत.महामंडळाच्या अंतर्गत संत भगवानबाबा निवासी वस्तीगृह सुरू करण्यातयेणारआहेत.ऊसतोड कामगारांना विमा संरक्षणाबरोबरच महिलांना आरोग्य सुविधा देण्याचाही प्रयत्न मंडळाकडून केला जाणार आहेत.


लोकनेते गोपीनाथराव मुंडे  ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या विभागिय कार्यालयाचे परळीत आज सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त तथा लोकनेते गोपीनाथराव मुंडे  ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या प्रादेशिक व्यवस्थापक जयश्री सोनकवडे- जाधव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.यावेळी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी,कर्मचारीवृंद उपस्थित होते.

Releated Posts

पॅशनला प्रोफेशन बनवून स्वत:ला उच्च स्थानावर घेऊन जा; मनीष खन्ना यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

प्रतिनिधी. युईआय कलिनरी कॉम्पिटिशनचे दिमाखात उद्घाटन; देशभरातील 9 कॅम्पसमधील सुमारे 150 विद्यार्थ्यांचा सहभाग हॉस्पिटॅलिटी आणि बिझनेस मॅनेजमेंट क्षेत्रातील…

ByBymnewsmarathi Dec 19, 2025

अंधेरीत फ्लश टॅंकमधून सापडले शेकडो ‘ब्लँक वोटर ID कार्ड ‘!!! चर्चा आणि चौकशीची मागणी वाढली

प्रतिनिधी अंधेरी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका इमारतीतील बाथरूमच्या फ्लश टॅंकमध्ये शेकडो कोरे (ब्लँक) मतदार…

ByBymnewsmarathi Nov 22, 2025

राज्यात यंदाचा गाळप हंगाम १ नोव्हेंबर पासून सुरू करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १० आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ५ रुपये कपातीचा निर्णय राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने नुकसान…

ByBymnewsmarathi Sep 30, 2025

राष्ट्रीय महाकाल सेनेचा झंजावत बारामती मध्ये

बारामती मध्ये दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी श्री महाकाल सेना सेवा संस्थान यांची राष्ट्रीय महाकाल सेनेची पहिली आढावा…

ByBymnewsmarathi Sep 22, 2025