• Home
  • माझा जिल्हा
  • जि. प. प्राथमिक शाळा कोळीवस्ती निंबुत येथे ७४व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
Image

जि. प. प्राथमिक शाळा कोळीवस्ती निंबुत येथे ७४व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

प्रतिनिधी

शालेय मुलांनी विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम सादर केले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून निंबुत ग्रामपंचायतच्या विद्यमान सदस्या विद्याताई काकडे,मा.ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय लकडे, विजय लकडे ,विराज जगताप सोमेश्वर सहकारी कारखान्याचे शेतकी अधिकारी संदीप लोखंडे ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश लकडे,

युवा कार्यकर्ते महेश लकडे सत्तारभाई सय्यद,रफिक सय्यद ,अनुप लकडे, आबू लकडे,गणेश लकडे, बारामती पंचायत समितीचे विषय तज्ञ सुदर्शन धायगुडे, बाळासाहेब खोपडे संतोष हाके व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव अंतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक वितरण करण्यात आले, शालेय मुलांना धैर्यशील काकडे व विराज जगताप यांच्या तर्फे चषक देण्यात आले. यावेळी शाळेला मोफत चार गुंठे जागेचे बक्षीस पत्र केल्याबद्दल महेश लकडे व शाळा बांधकाम होईपर्यंत स्वतःच्या नवीन खोल्या वर्गासाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल दत्तात्रय लकडे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी विद्याताई काकडे संदीप लोखंडे व सुदर्शन धायगुडे यांनी शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व शालेय विद्यार्थ्यांचे कौतुक केले. सर्वांचे आभार शाळेचे उपशिक्षिका विद्या भोसले यांनी मानले.

Releated Posts

स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार प्रदान, दै. पुढारीचे पत्रकार काशिनाथ पिंगळे यांना पत्रकारितेतील पुरस्कार

प्रतिनिधी पुणे येथील स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्ताने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार २०२६’ मंगळवार…

ByBymnewsmarathi Jul 10, 2026

“‘भराव नको, पूल बांधा’ : सोनकसवाडीचा पाझर तलाव वाचवण्यासाठी ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा”

  प्रतिनिधी बारामती-फलटण नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या बांधकामामुळे सोनकसवाडी (ता. बारामती) येथील पाझर तलावाच्या अस्तित्वावर संकट निर्माण झाल्याचा…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मावळमधील पाटण येथे घरांवर दरड कोसळली; कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, NDRF कडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू, पुणे-मुंबई हायवेवरील वाहतूक पूर्णपणे बंद!

​प्रतिनिधी मावळ तालुक्यातील पाटण गावात आज (६ जुलै) पहाटेच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. सतत सुरू…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या वतीनं श्रीक्षेत्र पंढरपूर येथे उभारण्यात आलेल्या धर्मशाळेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन.

उपसंपादक- अक्षय थोरात  मंचर आणि आंबेगाव तालुक्यातील ग्रामस्थांनी उभारलेली ही सुसज्ज धर्मशाळा हजारो वारकऱ्यांसाठी हक्काचा निवारा ठरेल आणि…

ByBymnewsmarathi Jul 4, 2026