सोमेश्वरनगर करंजेपूल शेंडकरवाडी येथील कॅनॉल वरील पूल ग्रामस्थांसाठी की, ठेकेदाराचे हितसंबंध जोपासण्यासाठी? नागरिकांमध्ये संभ्रम.

Uncategorized

संपादक मधुकर बनसोडे.

निरा ङावा कालव्यावर चाललेले ब्रिजचे काम शेंङकरवाङी ग्रामस्थ यांनी बंद पाडून आठवङा झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाअध्यक्ष संभाजीनाना होळकर यांनी ग्रामस्थ मंङळीं बरोबर सार्वजनिक बांधकाम खात्यातील अधिकारी लोकांबरोबर चर्चा घडवून आणली परंतू पूलाबाबतीत काहीही तोडगा निघाला नाही.आदरणीय संभाजीनाना यांनी वरीष्ठ अधिकारी यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ किंवा आदरणीय अजितदादा पवारसो यांना समक्ष भेटून त्यांना माहीती देऊ परंतू आठ दिवस झाले काहीही मार्ग किंवा शेंङकरवाङी ग्रामस्थ यांना माहीती मिळाली नाही. तरी शेंङकरवाङी ग्रामस्थ यांना दळणवळण करण्यासाठी अत्यंत कठीण अवस्था होऊन बसली आहे हा कॅनॉल वरील पूल नक्की नागरिकांच्या सुख सोयीसाठी बांधला आहे की ठेकेदाराचे हितसंबंध जोपासण्यासाठी? अधिकारी वर्गास कमिशन मिळण्यासाठी बांधला आहे का?

अशी देखील चर्चा परिसरामधील नागरिकांमधून होत आहे?. कॅनाॅल पास करायचा म्हटले तरी दोन किलोमीटर वरून वळसा घालून यावे लागत आहे. जनावरांना चारा किंवा शेतीची मशागत करायला दूरवरून जावे लागत आहे. तरी शेंङकरवाङी ग्रामस्थ पुलाची उंची कमी व्हावी या विषयावर ठाम आहेत. आदरणीय माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसो यांनी शेंङकरवाङीतील बांधकाम चाललेल्या पुलाला समक्ष भेट द्यावी व पुलाची ङिझाईन तपासावी आशी मागणी शेंङकरवाङीतील ग्रामस्थ करत आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याचा हा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. कारण नसताना अधिकचा निधी मंजूर करून ठेकेदार संभाळण्याचा उधोग कोण करतयं हे देखील दादांना समजले पाहीजे. आशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते शिवाजी शेंङकर प्रदिप शेंङकर महेश शेंङकर किरण शेङकर निखिलभैया शेंङकर राहूल शेंङकर दादासाहेब चौधरी सचिन चोरगे सुरेश शेंङकर व ग्रामस्थ मंङळींनी केली आहे.