• Home
  • इतर
  • मैं भारत हूँ, हम भारत के मतदाता है’ या गीताचे व्यापक प्रसारण करावे- प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे
Image

मैं भारत हूँ, हम भारत के मतदाता है’ या गीताचे व्यापक प्रसारण करावे- प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे

प्रतिनिधी

बारामती दि. ३: राष्ट्रीय मतदार दिनाच्या दिवशी प्रसारित केलेले ‘मैं भारत हूँ, हम भारत के मतदाता है’ या गीताचे सर्व ठिकाणी व्यापक स्वरूपात प्रसारण करून युवकांमध्ये मतदान करण्याविषयी जनजागृती करावी, असे आवाहन २०१ बारामती विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केले आहे

भारत निवणूक आयोगामार्फत राष्ट्रीय मतदार दिनाच्या दिवशी ‘मैं भारत हूँ, हम भारत के मतदाता है’ हे गीत प्रक्षेपित करण्यात आले होते. मतदारांमध्ये मतदानाविषयी जनजागृतीच्या दृष्टीने या गीताची व्यापक प्रमाणात प्रसार आणि प्रसिद्धी होणे आवश्यक आहे.

त्यासाठी तालुकास्तरीय नामांकित व्यक्ती, तालुक्यातील निवडणूक विषयक कामकाज हाताळणारे अधिकारी कर्मचारी, सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, कामगार तलाठी, मंडल अधिकारी, निवडणूक साक्षरता मंडळ, मतदार जागृती मंच, कंपन्याचे व्यवस्थापक, शाळा, महाविद्यालये आदींनी हे गीत https://youtu.be/to324Jlljf8 या संकेस्थळावरून डाऊनलोड करून त्याचे आपल्या स्तरावर प्रसारण करावे.

प्रेक्षागृहात सिनेमा सुरू होण्यापूर्वी व मध्यातरांमध्ये हे गीत व्यावसायिक सामाजिक उत्तरदायित्वांतर्गत प्रसारण करण्यात यावे. स्थानिक केबलवरुन या गीताचे प्रसारण करण्यात यावे. तसेच निवडणूकविषयक सर्व कार्यक्रमांमध्ये सदर गीत प्रसारित करण्यात यावे. या गीतास लाईक व शेअर करून इतर सामाजिक माध्यमांद्वारेही त्याचा प्रसार करावा, असे आवाहनही श्री. कांबळे यांनी केले आहे.
००००

Releated Posts

पॅशनला प्रोफेशन बनवून स्वत:ला उच्च स्थानावर घेऊन जा; मनीष खन्ना यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

प्रतिनिधी. युईआय कलिनरी कॉम्पिटिशनचे दिमाखात उद्घाटन; देशभरातील 9 कॅम्पसमधील सुमारे 150 विद्यार्थ्यांचा सहभाग हॉस्पिटॅलिटी आणि बिझनेस मॅनेजमेंट क्षेत्रातील…

ByBymnewsmarathi Dec 19, 2025

अंधेरीत फ्लश टॅंकमधून सापडले शेकडो ‘ब्लँक वोटर ID कार्ड ‘!!! चर्चा आणि चौकशीची मागणी वाढली

प्रतिनिधी अंधेरी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका इमारतीतील बाथरूमच्या फ्लश टॅंकमध्ये शेकडो कोरे (ब्लँक) मतदार…

ByBymnewsmarathi Nov 22, 2025

राज्यात यंदाचा गाळप हंगाम १ नोव्हेंबर पासून सुरू करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १० आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ५ रुपये कपातीचा निर्णय राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने नुकसान…

ByBymnewsmarathi Sep 30, 2025

राष्ट्रीय महाकाल सेनेचा झंजावत बारामती मध्ये

बारामती मध्ये दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी श्री महाकाल सेना सेवा संस्थान यांची राष्ट्रीय महाकाल सेनेची पहिली आढावा…

ByBymnewsmarathi Sep 22, 2025