संजय गांधी निराधार योजनेची १७८ प्रकरणे मंजूर
महत्त्वाचे मुद्दे
- १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
- २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
- ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.
प्रतिनिधी
बारामती,दि ६ : संजय गांधी निराधार अनुदान योजना लाभार्थी निवडीसाठी आज प्रशासकीय भवन बारामती येथे तहसिलदार विजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत १७८ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली.

बैठकीत एकूण १८४ अर्जाची छाननी करण्यात आली. यामध्ये संजय गांधी योजनेच्या १२१ प्राप्त अर्जापैकी ११८ मंजूर तर ०३ अर्ज नामंजूर करण्यात आले. श्रावणबाळ योजनेचे ५६ प्राप्त अर्जापैकी ५३ अर्ज मंजूर तर ०३ अर्ज नामंजूर करण्यात आले. इंदिरा गांधी योजनेचे प्राप्त ०६ तर राष्ट्रीय कुटुंब योजनेचे प्राप्त ०१ अर्ज मंजूर करण्यात आले.
