• Home
  • क्राईम
  • बेकायदेशीर गॅस रिफील सेंटरवर छापा
Image

बेकायदेशीर गॅस रिफील सेंटरवर छापा

प्रतिनिधी

बारामती शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकास खबर लागली की सर्वे नंबर 856 अशोक नगर या ठिकाणी मुजीब गणीभाई बागवान राहणार अशोक नगर हा स्वतःच्या घराच्या बाजूला घरगुती वापरातील गॅस मशीनच्या साह्याने घरगुती वापराचा गॅस कमर्शिअल गॅस मध्ये तसेच गाड्यांमध्ये तसेच छोट्या छोट्या एक किलो दोन किलोच्या गॅस मध्ये भरून चढ्या भावाने विक्री करत असल्याची

माहिती मिळाली त्या ठिकाणी पुरवठा विभागाच्या मदतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ पोलीस नाईक दशरथ कोळेकर पोलीस हवालदार कल्याण खांडेकर पोलीस शिपाई तुषार चव्हाण शाहू राणे जामदार यांनी पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या आदेशान्वये छापा मारला त्या ठिकाणी लहान मोठ्या 57 गॅस सिलेंडरच्या टाक्या मिळून आल्या त्याची एकूण किंमत 74 हजार रुपये आहे तसेच त्या ठिकाणी गॅस ट्रान्सफर करणाऱ्या मोटरी व मशीन सुद्धा मिळून आल्या याप्रकारे धोकादायक पद्धतीने गॅस रिफिलिंग केला तर परिसरातील लोकांच्या जीवित सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो म्हणून भादवी कलमाने सुद्धा त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे तसेच अत्यावश्यक वस्तू कायदा कलम तीन सात प्रमाणे सुद्धा कारवाई करण्यात आलेली आहे मनेर याला अटक करण्यात आली असून दोन दिवस पोलीस कोठडी मिळालेली आहे सदर आरोपी हा गॅस गजानन सुर्वे यांच्याकडून घेत असल्याचे सांगितले आणि त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदरचे गॅस कोणत्या गॅस एजन्सीतून येत होते याबाबत सुद्धा सखोल चौकशी करण्यात येत आहे

सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे मा.पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे करण्यात आली

Releated Posts

15 वर्षांनी न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय कस्टडीत मृत्यू प्रकरणात 9 पोलिसांना दिली जन्मठेप शिक्षा.

प्रतिनिधी पोलीस कोठडीत संशयिताचा मृत्यू झाल्याप्रकरणी वाशिमच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने 15 वर्षांनंतर ऐतिहासिक निर्णय देत रिसोड…

ByBymnewsmarathi Jul 3, 2026

अवैध हातभट्टी बंद… मात्र परवानाधारक दारूच्या अवैध विक्रीला उधाण?

प्रतिनिधी एक्साईज विभाग आणि पोलिसांच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष हडपसर परिसरात अवैध दारूच्या सेवनामुळे झालेल्या मृत्यूच्या घटनेनंतर राज्यभरात पोलिस…

ByBymnewsmarathi Jul 3, 2026

मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीसह आश्रय देणाऱ्या इसमाला गुन्हे शाखा युनिट-५ कडून अटक!

प्रतिनिधी: वानवडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोक्का (MCOCA) गुन्ह्यात गेल्या १ वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला आणि त्याला आश्रय…

ByBymnewsmarathi Jul 2, 2026

​मेढद येथे माळेगाव पोलिसांची मोठी कारवाई; साडेतीन लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

सहसंपादक- अक्षय थोरात पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल आणि अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांच्या आदेशानुसार, माळेगाव…

ByBymnewsmarathi Jul 1, 2026