संपादक मधुकर बनसोडे.
नीरा बारामती रस्त्याचे सध्या रस्ता रुंदीकरणाचे काम चालू आहे त्यासाठी अनेक वर्षांपूर्वीची झाडे देखील कत्तल करण्यात आली.
मात्र हा रस्ता होत असताना खरंच तो रस्ता नागरिकांच्या सुख सोयीसाठी केला जातोय की कोणाचे तरी किसे गरम करण्यासाठी केला जातोय अशी चर्चा सध्या बारामती तालुक्यातील नागरिकांमधून होत आहे.
वडगाव निंबाळकर येथे देखील काही दिवसापूर्वी या रस्त्याच्या विरोधात काही ग्रामस्थांनी संबंधित पीडब्ल्यूडी विभागातील अधिकाऱ्यांना या रस्त्यावरील काम निकृष्ट दर्जेचे होत आहे असे सांगितले मात्र संबंधित अधिकाऱ्यांकडून उडवा उडवीची उत्तरे दिली जातात. या रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदारावरती पीडब्ल्यूडी च्या अधिकाऱ्यांचे अंकुश नाही का नक्की कोणत्या कारणासाठी अधिकारी वर्ग ठेकेदारांना पाठीशी घालतात याबाबतीत देखील तालुक्यामध्ये अनेक चर्चांना उधान आले आहे. सोमेश्वर परिसरामध्ये देखील या रस्त्याचे काम चालू आहे काम चालू झाल्यानंतर सहा ते आठ तासांमध्येच टाकलेले डांबर खडी सकट रस्त्यावरून वेगळे होत आहे मग रस्ता नक्की करायचा आहे तरी कशासाठी! आत्ता चालू आहे त्याच्यापेक्षा जुनाच रस्ता बरा की काय असे देखील स्थानिक ग्रामस्थांमधून बोलले जात आहे. वेळेत संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी आपले लक्ष केंद्रित करून योग्य पद्धतीने रस्त्याचे काम करून घ्यावे अन्यथा येणाऱ्या काळामध्ये याच रस्त्यावरती उपोषणाला बसल्याशिवाय ग्रामस्थ राहणार नाहीत अशी देखील चर्चा परिसरातील नागरिकांमधून होत आहे