लोन मंजूर करून देतो म्हणून पैसे घेणाऱ्याला शहर पोलिसांकडून अटक

क्राईम

प्रतिनिधी

लहान उद्योग व्यवसाय, दररोजच्या उपजीविकेसाठी लोकांना छोट्या कर्जाची गरज लागते. कर्ज काढण्याची प्रक्रिया ही गुंतागुंतीची व किचकट असल्यामुळे कर्ज काढून देतो असे सांगणाऱ्या दलालांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे गरज असलेली लोक अपुरे कागदपत्र असलेले लोक त्यांच्याकडे जातात. असेच एका साताऱ्याचा निलेश रवींद्र फरांदे वय 28 राहणार आणेवाडी तालुका जावळी जिल्हा सातारा याने त्याला बारामतीत कोणी ओळखत नाही अश्या ठिकाणी फसवून निघून जनेचे दृष्टीने डीसी फायनान्स नावाने एक फॉर्म बारामती मध्ये सुरू केली सदर फॉर्म च्या माध्यमातून त्यांनी एजंट नेमून लोन करून देतो असा प्रचार केला व त्या एजंटच्या मार्फतीने आगाऊ पिग्मी लोकांकडून गोळा केली व त्या बदल्यात त्यांना सांगितले की त्यांना एक लाखापर्यंत लोन मंजूर केले जाईल

 गरजूवंत लोकांनी त्यांना लोन ची आवश्यकता असल्याने दहा ते पंधरा हजार रुपये हप्त्यामध्ये पिग्मी एक महिन्यापासून यांच्या एजंट कडे दिले आणि एक दिवस हे डीसी फायनान्स या नावाने ओपन केलेले गुणवडी चौकातील कार्यालय बंद करून तो निघून गेला त्याचे नेमलेले एजंट ला सुद्धा तो कुठला आहे हे माहीत नव्हते त्याने लोकांची साडेचार लाख रुपयांची फसवणूक केली पोलिसांनी तक्रारदाराकडून माहिती घेऊन सदरच्या व्यक्तीला जेजुरी या ठिकाणाहून अटक करून त्याला पाच दिवस पोलीस कोठडी घेण्यात आलेली आहे सदर व्यक्तीकडून फसवलेल्या साडेचार लाखांपैकी तीन लाख रुपये रोकड मध्ये पोलिसांनी हस्तगत केलेली आहे व गोरगरिबांची पुंजी त्यांना किमान 80 टक्के तरी परत मिळणार आहे. सदर आरोपीला कुणीही लोक ओळखत नव्हते ज्यांनी पैसे गोळा करून आणले त्यांच्याबरोबर लोक भांडायला जात होते.

सदरच्या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक घोडके पोलीस हवालदार रामचंद्र शिंदे सागर जामदार करत आहेत

बारामती मध्ये असे लोन करून देणारे काही लोक दुकान खोलतात तसेच अनेक लोक तुम्हाला गुंतवणुकीवर वाढीव दराने व्याज मिळवून देऊ व तुमचे पैसे शेअर मध्ये गुंतवणूक करू असे सांगून एग्रीमेंट करून देतात व पैसे घेतात नंतर त्यांनी शेअर मध्ये गुंतवलेले पैसे हे शेअर भाव पडल्याने त्यांना अपेक्षित असलेला परतावा मिळत नसल्याने बुडतात व मग गोळा करणारा एजंट लोकांचे पैसे देत नाही व पोबारा करतो आणि मग नंतर लोक पोलीस स्टेशनला येतात तोपर्यंत वेळ गेलेला असतो गुन्हा दाखल होतो परंतु पैसे परत मिळत नाहीत तरी सर्व लोकांना विनंती करण्यात येत आहे की आपण आपली कमवलेली गुंतवणूक ही अधिकृत ठिकाणीच गुंतवणूक करा जास्त परताव्याच्या पाठीमागे लागू नका अनधिकृत पणे जास्त रिटर्नच्या अपेक्षेने आपण गुंतवणूक करू नका त्यातून आपले पैसे बुडण्याचा धोका जास्त असतो अशा प्रकारचे बारामती मध्ये काही जर फायनान्स गुंतवणूक शेयर गुंतवणूक एग्रीमेंटच्या आधारे करून देणारे व डिमॅट अकाउंट न खोलता करून देणारे ऑफिस असतील आणि आपणास शंका आली तर पोलीस स्टेशनची संपर्क करावा