• Home
  • इतर
  • बारामती!वडगाव निंबाळकर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं.१ येथे *शिवजयंती* उत्साहात साजरी..!
Image

बारामती!वडगाव निंबाळकर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं.१ येथे *शिवजयंती* उत्साहात साजरी..!

वडगाव निं. प्रतिनिधी- फिरोज भालदार

आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव निंबाळकर नंबर एक येते 393 वी जयंती शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी *आयुष चव्हाण* या विद्यार्थ्याच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले.याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका अरुणा आगम,उपशिक्षिका मालन बोडरे,सुरेखा मगदूम,उपशिक्षक अनिल गवळी आणि शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य शेखर आगम उपस्थित होते.


यावेळी छोट्या विद्यार्थ्यांची बालसभा यावेळी घेण्यात आली.बालसभेच्या अध्यक्षपदी विद्यार्थी चि.यशराज अडागळे होते. यावेळी रुद्र खोमणे,सोहम चव्हाण,आयुष चव्हाण,यशराज अडागळे,आयान बागवान,वरद भंडलकर,आकाश आगम विद्यार्थ्यांनी शिवजयंती निमित्त भाषणे केली. अनिल गवळी यांनी छत्रपती शिवरायांच्याबद्दल ऐतिहासिक माहिती सांगितली.यावेळी महाराष्ट्राचे राज्यगीत *जय जय महाराष्ट्र माझा* वाजवण्यात आले.मुलांना खाऊवाटप केले.मुख्याध्यापिका अरुणा आगम यांनी प्रास्ताविक केले तर उपशिक्षिका मालन बोडरे यांनी आभार मानले आणि सूत्रसंचालन अनिल गवळी यांनी केले.

Releated Posts

पॅशनला प्रोफेशन बनवून स्वत:ला उच्च स्थानावर घेऊन जा; मनीष खन्ना यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

प्रतिनिधी. युईआय कलिनरी कॉम्पिटिशनचे दिमाखात उद्घाटन; देशभरातील 9 कॅम्पसमधील सुमारे 150 विद्यार्थ्यांचा सहभाग हॉस्पिटॅलिटी आणि बिझनेस मॅनेजमेंट क्षेत्रातील…

ByBymnewsmarathi Dec 19, 2025

अंधेरीत फ्लश टॅंकमधून सापडले शेकडो ‘ब्लँक वोटर ID कार्ड ‘!!! चर्चा आणि चौकशीची मागणी वाढली

प्रतिनिधी अंधेरी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका इमारतीतील बाथरूमच्या फ्लश टॅंकमध्ये शेकडो कोरे (ब्लँक) मतदार…

ByBymnewsmarathi Nov 22, 2025

राज्यात यंदाचा गाळप हंगाम १ नोव्हेंबर पासून सुरू करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १० आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ५ रुपये कपातीचा निर्णय राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने नुकसान…

ByBymnewsmarathi Sep 30, 2025

राष्ट्रीय महाकाल सेनेचा झंजावत बारामती मध्ये

बारामती मध्ये दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी श्री महाकाल सेना सेवा संस्थान यांची राष्ट्रीय महाकाल सेनेची पहिली आढावा…

ByBymnewsmarathi Sep 22, 2025