सणवारांच्या काळात रेल्वे स्थानकांवरील गर्दीचे नियंत्रण आणि नियमन करण्यासाठी रेल्वेच्या विविध उपाययोजना

Uncategorized

प्रतिनिधी

सध्याच्या उत्सव काळात, रेल्वे स्थानके आणि गाड्यांमध्ये कित्येक पट गर्दी दिसत आहे. या रेल्वे स्थानकांवर आणि गाड्यांमध्ये दिसत असलेल्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी रेल्वेने, गर्दीचे नियमन करणाऱ्या विविध उपाययोजना केल्या आहेत.

रेल्वेने केलेल्या विविध उपाययोजना खालीलप्रमाणे:

जेवढे शक्य आहे, तेवढे रेल्वेने, गाड्या सुव्यवस्थित चालवण्याचा प्रयत्न केला आहे, त्याची माहिती आणि नंबर रेल्वे स्थानकांच्या फलाटांवरील डिस्प्ले बोर्डावर देण्यात येत आहेत. प्लॅटफॉर्म बदलले जात नाहीत. रेल्वेचे सर्व रेक्स, अगदी विशेष रेल्वेगाड्यांचे रेक्स फलाटावर गाडी सुटण्याच्या किमान अर्धा तास आधी आणले जातात.रेल्वे चौकशी यंत्रणा आणि उद्घोषणा व्यवस्था सुरळीत सुरु राहील हे सुनिश्चित केले जात आहे. सर्व गाड्यांची माहिती देणारे फलक सुरळीत कार्यरत असतील हे सुनिश्चित केले गेले असून, त्यावर अद्ययावत माहिती दिली जात आहे.

एस्केलेटरचे व्यवस्थापन :

एका व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून एस्केलेटर व्यवस्थेवर नियमित देखरेख ठेवली जात आहे. रेल्वे स्थानकावर जर काही अनुचित घटना झाली तर, खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे स्थानकांच्या जवळची रेल्वे रुग्णालये, रेल्वे दवाखाने यांनाही सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मिनी कंट्रोल पॅनल :

सर्व टर्मिनल स्थानकांवर, कार्यान्वयन, व्यावसायिक विभाग, मॅकेनिकल, अभियांत्रिकी, इलेक्ट्रिकल, आरपीएफ आणि मेडिकल अशा सर्व विभागांचे कर्मचारी वृंद यांच्या मिनी कंट्रोल रूम्स तयार करण्यात आल्या आहेत (6 वाजेपासून ते रात्री 12 वाजेपर्यंत) या सुसज्ज अशा मिनी कंट्रोल रूम्समध्ये सर्व व्यवस्था आहेत दूरध्वनी, गाडीची माहिती, पॅनल रूम, फलाट आणि आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही अशा सगळ्यांशी संपर्कव्यवस्था अशा सुविधा देण्यात आल्या आहेत.अतिशय गर्दीच्या वेळी, विशेष कार्य अधिकारी (SDO) म्हणून अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे अधिकारी संपूर्ण देखरेख आणि समन्वयाचं काम करतात.

अतिरिक्त प्रवाशांसाठी प्रतीक्षालये आणि इतर सुविधा :

टर्मिनल स्थानकांवर, आसपासच्या जागांवर, 500 प्रवाशांची सोय होऊ शकेल, अशा क्षमतेचे तंबू उभारले जात आहेत. या तात्पुरत्या प्रतीक्षालयात, मोबाइल शौचालये, पाण्याचे नळ, अतिरिक्त आरक्षण खिडक्या आणि यूटीएस बुकिंग काऊंटर्स, तसेच चौकशी कक्ष, मोठ्या आकाराच्या एलसीडी स्क्रीनवर गाड्यांची माहिती आणि लोकांच्या तक्रार निवारणाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आणि आरपीएफ चा मदत कक्ष देखील उभरण्यात आला आहे.

वैद्यकीय सुविधा :

रेल्वे स्थानकांवर, सकाळी सहा ते रात्री 12 पर्यंत डॉक्टर्स उपलब्ध असतात. टर्मिनल स्थानकांवरम तसेच सर्व महत्वाच्या स्थानकांवर, 24 तास तात्काळ वैद्यकीय सेवा उपलब्ध होऊ शकेल. तसेच,निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांसह प्रथमोपचार सेवा, पुरेसे स्ट्रेचर्स आणि व्हीलचेअर्स देखील उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्याशिवाय प्रत्येक स्थानकावर रुग्णवाहिका असतील, हे सुनिश्चित करण्यात आले आहे.

अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती:

गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि प्रवाशांना मदत करण्यासाठी अतिरिक्त व्यावसायिक कर्मचारी, आरपीएफ आणि आरपीएसएफ, जीआरपी कर्मचारी, नागरी संरक्षण स्वयंसेवक आणि स्काउट आणि मार्गदर्शक तैनात करण्यात आले आहेत.