• Home
  • सामाजिक
  • शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमध्ये भ्रमणध्वनी क्रमांक समाविष्ट करण्याचे आवाहन
Image

शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमध्ये भ्रमणध्वनी क्रमांक समाविष्ट करण्याचे आवाहन

प्रतिनिधी

सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमध्ये (आरसीएमएस) लाभार्थ्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक समाविष्ट करण्याची मोहीम सुरु करण्यात आली असून जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी आपले भ्रमणध्वनी क्रमांक फेब्रुवारी व मार्च २०२३ चे धान्य घेताना समाविष्ट करुन घ्यावेत.

लाभार्थ्यांनी भ्रमणध्वनी क्रमांक शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमध्ये समाविष्ट केल्यास त्यांनी धान्य घेतल्यानंतर प्राप्त होणारे संदेश भ्रमणध्वनीवर प्राप्त होणार आहेत. त्यामुळे आपले धान्य घेतावेळी दुकानदारांकडे ई-पॉस मशिनद्वारे भ्रमणध्वनी क्रमांक समाविष्ट करता येतील. तसेच यापूर्वी समाविष्ट भ्रमणध्वनी क्रमांक चुकीचा असल्यास सुधारित भ्रमणध्वनी क्रमांक तालुका पुरवठा कार्यालयात देऊन प्रणालीमध्ये समाविष्ट करता येणार येणार आहे.

तरी सर्व लाभार्थ्यांनी आपले भ्रमणध्वनी क्रमांक समाविष्ट करण्यासाठी तालुका पुरवठा कार्यालय, परिमंडळ कार्यालय तसेच रास्तभाव दुकानदार यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने यांनी दिली आहे.

Releated Posts

रक्तदान करुन वाढदिवस साजरा व पुलवामा हल्ल्यातील हुतात्म्यांना आदरांजली

कोरोना काळात व जम्मु-काश्मिर येथे आयोजित सिंदूर महारक्तदान शिबिरात आरोग्यदुत श्री.कृष्णमुर्ती जगताप यांचा सक्रिय सहभाग बारामती – वैद्यकिय,सामाजिक,…

ByBymnewsmarathi Feb 14, 2026

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनतर्फे पत्रकार दिनाच्या पत्रकारांना अनोख्या पद्धतीने शुभेच्छा.

प्रतिनिधी वडगाव निंबाळकर (ता. बारामती) येथील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून सर्व पत्रकार बांधवांचा…

ByBymnewsmarathi Jan 6, 2026

बारामती बिबट्या संदर्भातील चुकीच्या बातमीबाबत स्पष्टीकरण व जाहीर माफी.

आमच्या ‘एम न्यूज मराठी’ (M News Marathi) या न्यूज पोर्टलवर काल, दिनांक २३ डिसेंबर २०२५ रोजी बारामती परिसरात…

ByBymnewsmarathi Dec 24, 2025

भीमाशंकर मंदिर ३ महिने बंद ठेवण्याबाबत प्रशासकीय चर्चा; लवकरच होणार अंतिम निर्णय

प्रतिनिधी बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे २०२७ च्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर २८८.१७ कोटींचा विकास…

ByBymnewsmarathi Dec 24, 2025