संपादक मधुकर बनसोडे
पत्रकारांवरील हल्ले हे दिवसेंदिवस वाढतच चाललेले आहेत अनेक ठिकाणी पत्रकारांवरती जीव घेणे हल्ले होत आहेत अशा परिस्थितीमध्ये संविधानाचा चौथा स्तंभ सुरक्षित आहे का? यावरती प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
स्वतःच्या प्रपंचावरती तुळशीपत्र ठेवून समाज हिताचे काम करणारे पत्रकार बांधव या देशात खरंच आज सुरक्षित आहेत का?. या गोष्टीला खरंतर विखुरलेले पत्रकार देखील कुठेतरी जबाबदार आहेत का? याचा देखील पत्रकार बांधवांनी खऱ्या अर्थाने विचार करणे गरजेचे आहे. अनेक ठिकाणी काही घटना अशा देखील घडलेल्या आहेत जर पत्रकाराने एखाद्या व्यक्तीची चुकीची सत्यता जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला तर अशा पत्रकार बांधवांना खंडणी सारख्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला जातो. एक प्रकारे ही पत्रकाराची व पत्रकारितेची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न समाजातील काही समाजकंटक करीत आहेत. अनेक ठिकाणी पत्रकारांवरती हल्ले झाल्यानंतर पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा नोंद करण्यासाठी अनेक पत्रकार संघटनेंना निवेदन द्यावे लागते ही देखील शोकांतिकाच नाही का पोलीस प्रशासनाने निवेदन देण्या अगोदरच जर एखाद्या पत्रकार बांधवावरती हल्ला होत असेल तर पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केलाच पाहिजे. देशामध्ये अनेक पत्रकार संघटना आहेत मात्र काही संघटना रस्त्यावरती येऊन काम करत असतात तर काही संघटना फक्त नावापुरत्याच अस्तित्वात आहेत का? जोपर्यंत विखुरलेला पत्रकार बांधव एकसंघ होत नाही तोपर्यंत अशा घटनांना आळा बसणार नाही हा डिजिटल मीडियाचा पत्रकार आहे, हा प्रिंट मीडियाचा पत्रकार आहे, हा इलेक्ट्रॉनिक मीडियाचा पत्रकार आहे, अशा गोष्टी त्वरित थांबवून सर्व पत्रकार बांधवांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे असे आवाहन डिजिटल मीडिया एक संघाच्या वतीने करण्यात येत आहे.