• Home
  • माझा जिल्हा
  • बारामती ! सांगवी येथे श्री. साई इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.
Image

बारामती ! सांगवी येथे श्री. साई इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.

प्रतिनिधी – फिरोज भालदार

दि.२८/२/२०२३ रोजी एच. इ. इ. सोसायटीचे श्री. साई इंग्लिश मिडियम स्कूल सांगवी ता. बारामती येथे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते . या स्नेहसंमेलन मध्ये श्री साई इंग्लिश मीडियम स्कूल यांनी विविध कार्यक्रम आयोजित केले होते. या वार्षिक स्नेहसंमेलन मध्ये वेगवेगळे संगीत, नाटक ,नृत्य गीत , सादर करण्यात आले.

यावेळी प्रमुख उपस्थिती ग्रामीण मराठी साहित्यिक कथाकार प्रोफेसर रवींद्र कोकरे सर , शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री हनुमंतराव वामन एजगर सर , सोसायटी सचिव श्री मंगेश हनुमंतराव एजगर सर , क्रांतिसिंह नाना पाटील हायस्कूल सरडे चे मुख्याध्यापक गरगडे सर, राष्ट्रीय किक बॉक्सर खेळाडू व बारामती स्काऊट आणि गाईड्स कार्यकारणी सदस्य मंगेश खोमणे सर, प्रमुख आकर्षण व कलाकार झी मराठी फेम डान्स महाराष्ट्र डान्स लिटिल मास्टर कार्तिक लोखंडे व त्याचे गुरु योगेश ननवरे सर हे उपस्थित होते .

 यावेळी मराठी फेम डान्स लिटिल मास्टर कार्तिक लोखंडे याचा डान्स पाहून कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता त्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळाले. ज्या विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेतले होते व माता पालक यांनी देखील क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेतलेले होते यांना शाळेतर्फे पारितोषिक देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी पालक मोठ्या संखेने उपस्थीत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ बोबडे डी.डी ,सौ तावरे एस डी, सौ. शिपकूले आर व्हि यांनी केले कार्यक्रमाचे आभार पर्यवेक्षक किशोर उन्हवणे सर यांनी केले.

Releated Posts

“‘भराव नको, पूल बांधा’ : सोनकसवाडीचा पाझर तलाव वाचवण्यासाठी ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा”

  प्रतिनिधी बारामती-फलटण नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या बांधकामामुळे सोनकसवाडी (ता. बारामती) येथील पाझर तलावाच्या अस्तित्वावर संकट निर्माण झाल्याचा…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मावळमधील पाटण येथे घरांवर दरड कोसळली; कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, NDRF कडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू, पुणे-मुंबई हायवेवरील वाहतूक पूर्णपणे बंद!

​प्रतिनिधी मावळ तालुक्यातील पाटण गावात आज (६ जुलै) पहाटेच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. सतत सुरू…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या वतीनं श्रीक्षेत्र पंढरपूर येथे उभारण्यात आलेल्या धर्मशाळेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन.

उपसंपादक- अक्षय थोरात  मंचर आणि आंबेगाव तालुक्यातील ग्रामस्थांनी उभारलेली ही सुसज्ज धर्मशाळा हजारो वारकऱ्यांसाठी हक्काचा निवारा ठरेल आणि…

ByBymnewsmarathi Jul 4, 2026

बारामती तालुक्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा तीन दिवसीय अभ्यासवर्ग उत्साहात संपन्न

प्रतिनिधी  अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप), बारामती तालुक्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेला तीन दिवसीय अभ्यासवर्ग दि. २६, २७…

ByBymnewsmarathi Jun 29, 2026