अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या कर्ज योजनेच्या सोडतीला हजर राहण्याचे आवाहन

सामाजिक

प्रतिनिधी

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत थेट कर्ज योजनेअंतर्गत पात्र प्रस्तावातून १० मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, येरवडा, पुणे येथे सोडत काढण्यात येणार असून अर्जदारांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महामंडळामार्फत नव्याने थेट कर्ज योजनेअंतर्गत प्रती लाभार्थी १ लाख रुपये प्रमाणे ७० लाभार्थ्यांचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. या योजनेअंतर्गत २० डिसेंबर २०२२ अखेर ३६१ प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यापैकी ३२८ प्रस्ताव सोडतीसाठी पात्र ठरले असून ३३ प्रस्ताव अपात्र ठरविण्यात आले आहेत.

पात्र ठरविण्यात आलेल्या अर्जाची सोडत १० मार्च रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सर्वे नंबर १०३/१०४, मेंटल कॉर्नर, विश्रांतवाडी पोलीस स्टेशन समोर, येरवडा, पुणे येथे काढण्यात येणार आहे. पात्र अर्जदारांची यादी जिल्हा कार्यालयात लावण्यात आलेली असून त्यांनी सोडतीदिवशी हजर राहण्याचे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक शि. लि. मांजरे यांनी केले आहे.