वडगाव नि. प्रतिनिधी – फिरोज भालदार
८ मार्च हा दिवस जागतिकz महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. याचेच औचित्य साधून बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील ग्रामपंचायत यांनी महिला दिवस कार्यक्रम आयोजित केले आहे. यावेळी महिला संमारंभ आयोजित केले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन सौ.सुमित्राताई पवार अध्यक्ष बारामती टेक्स्टाईल पार्क एन्व्हायरमेंटल फोरम, सौ. मनीषा तावरे सदस्य जिल्हा परिषद पुणे, सौ. रोहिणी तावरे सदस्य जिल्हा परिषद पुणे , प्रणिता खोमणे व्हाईस चेअरमन सोमेश्वर सहकारी साखर कारखाना , सौ. मेनका मगर सदस्य पंचायत समिती बारामती तालुका , अंजली खजिनदार अध्यक्ष महिला आघाडी भाजपा , स्त्री रोग तज्ञ बारामती डॉ. सौ. मोनाली जाधव, निर्भया पथक प्रमुख पोलीस अमृताताई भोईटे, यांच्या हस्ते करण्यात आले व या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कार्यक्षम सौ. वनिताताई बनकर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष .
बारामती तालुका जागतिक महिला दिनानिमित्त वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत येथे फेस्टिवल चा कार्यक्रम ठेवला गेला आहे. यामध्ये बुधवार दिनांक ८/३/२०२३ रोजी सकाळी १० वाजता उद्घाटन समारंभ पार पडला यामध्ये महिलांचा सन्मान करण्यात आला व सायंकाळी खास महिलांसाठी फॅशन शो चा कार्यक्रम झाला. यावेळी अमृता भोईटे निर्भया पथक , डॉक्टर सोनाली खाडे, डॉक्टर मोनाली जाधव स्त्रीरोग तज्ञ, यांचे मार्गदर्शन देखील महिलांना व ग्रामस्थांना लाभले .
गुरुवार दिनांक ९/३/२०२३ रोजी सकाळी १०.३०ते १२.३० लहान मुलांचे संस्कृती कार्यक्रम व दुपारी १२.३० ते १.३० प्रसिद्ध जादूगार शिवम वडगाव निंबाळकर यांचे जादूचे प्रयोग दाखवण्यात येणार आहेत. सायंकाळी महिलांसाठी मंगळागौर कार्यक्रम होणार आहे.
दिनांक १०/३/२०२३ रोजी सकाळी ११ ते २ वा. सलीम सय्यद शेख बारामती यांचा सांस्कृतिक कार्यक्रम व मुलांसाठी प्रश्नमंजुषा व हा कार्यक्रमाचा सेवट महिलांसाठी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम सुप्रसिद्ध निवेदक अभिनेता खेळांचा बादशाह बाळकृष्ण नेहरकर सिने अभिनेत्री सह हा कार्यक्रम पार पडणार आहे .
या कार्यक्रमासाठी वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, व ग्राम विकास अधिकारी व सदस्य मंडळी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे . यामध्ये आजी माजी सर्व पदाधिकारी,सर्व तरुण मंडळ , आणि कर्मचारी वर्ग यांचा देखील या कार्यक्रमासाठी प्रतिसाद व सहकार्य लाभले आहे. या कार्यक्रमांसाठी महिलांचा चांगला असा प्रतिसाद ही मिळत आहे. व वडगाव निंबाळकर व शेजारिल गावच्या महिलांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतलेला आहे व या कार्यक्रमाचा आंनद ही लुटत आहेत .