बारामती प्रांताधिकारी कार्यालय समोर दादू मांगडे यांच्या आमरण उपोषणाचा दुसरा दिवस.

सामाजिक

संपादक मधुकर बनसोडे.

 बारामती तालुक्यातील वाघळवाडी हे गाव भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी गेले अनेक दिवसांपासून पंचायत समिती पासून ते जिल्हा परिषद पुणे पर्यंत अनेक शासकीय कार्यालयांना भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी यासाठी निवेदन देणारे सामाजिक कार्यकर्ते दादू मांगडे यांच्या अर्जाची दखल न घेतल्यामुळे आठ मार्चपासून ते आमरण उपोषणासाठी बारामती येथील प्रांत कार्यालयासमोर आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत. ग्रामपंचायत वागळवाडी यांच्या माध्यमातून बांधण्यात आलेले पत्र्याचे शेड ( स्मशानभूमी ) हे पाटबंधारे विभागाच्या जागेत आहे या ठिकाणी निधीचा गैरवापर झालेला आहे याची सखोल चौकशी करून संबंधितांवरती फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी उपोषणकर्ते दादू मंगडे यांनी केलेली आहे.

 तसेच ग्रामपंचायत वाघळवाडी मध्ये मागील पाच वर्षात जी विकास कामे झालेली आहेत त्या विकास कामांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे दादू मांगडे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. सदर प्रकरणांची जोपर्यंत सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी पदाधिकारी यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल होत नाहीत तोपर्यंत माझे उपोषण मी माघारी घेणार नाही असे देखील दादू मांगडे यांनी सांगितले.

 यावेळी बोलताना दादू मांगडे यांनी असे देखील सांगितले की उपोषण दरम्यान जर माझ्या जीवितास काही धोका निर्माण झाला तर त्यास पंचायत समिती अधिकारी वर्ग जबाबदार राहील.संबंधित विभागाकडून मांगडे यांच्या उपोषणाची दखल घेतली जाणार का? बारामती तालुक्याचे आमदार व विरोधी पक्ष नेते अजित पवार यांना देखील भ्रष्टाचार करणाऱ्या व्यक्तींची मोठ्या प्रमाणात चीड आहे आणि त्याच बारामती तालुक्यातील वाघळवाडी गावातील एका तरुणाला भ्रष्टाचाराच्या विरोधात उपोषणाला बसावे लागते दुसरा दिवस उजळतो तरी देखील प्रशासन दखल घेत नाही ही खरंतर शोकांतिकाच. संबंधित प्रशासनाने त्वरित मांगडे यांच्या उपोषणाची दखल घेऊन सत्यता पडताळून संबंधित दोषींवरती कारवाई करण्याचे आदेश देऊन उपोषण करतेस न्याय द्यावा अशी चर्चा बारामती तालुक्यातील गावांमध्ये रंगू लागली आहे.