संपादक मधुकर बनसोडे.
तिथीप्रमाणे निंबूत येते श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून निंबूत येथील विठ्ठल मंदिरामध्ये शिवनौकेतन तरुण मंडळ यांच्या वतीने.
शिवकालीन हत्यारे, व विविध नाण्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. दहा तारखेला सकाळी आठ वाजता ज्योत आणण्यात आली महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून छत्रपती शिवाजी महाराज की जय,जय भवानी जय शिवाजी, हरहर महादेव, अशा घोषणा देऊन जयंतीला सुरुवात झाली. संध्याकाळी सात वाजता पारंपारिक वाद्याच्या साह्याने मिरवणुकीला सुरुवात झाली. ढोल,लेझीम, बँड, हलगी, असे विविध प्रकारचे वाद्य या मिरवणुकीत पाहिला मिळाले. तरुण वर्गाने फटाक्यांची आतिषबाजी करत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा आनंद घेतला.
अनेक तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज. यांची वेशभूषा देखील केलेली होती. यावेळी करंजे पूल पोलीस चौकी यांच्याकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.