मुख्य मजकुरावर जा
Monday, 7 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 15 March 2023 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
March 15, 2023 1 मिनिट वाचन 8,514 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी -विजय गायकवाड
आज स्वारगेट डेपोतील कायम चालक शशांक देशमाने यांचा मार्ग क्र. २ वरती सकाळ पाळीत काम करत असताना अभिनव कॉलेज चौकात pmpml बस व कारचा किरकोळ अपघात झाला. त्या अपघातात किरकोळ वादविवाद झाले त्या वादातून आपले चालक देशमाने यांस मारहाण करत डोक्यात दगड मारला.. त्या मुळे देशमाने हे जखमी झाले व खूप रक्तस्त्राव झाला.


प्राथमिक माहितीतून असे कळाले आहे की ज्या कार चालकाचा अपघात झाला होता ते व त्यांच्या बरोबरील कारमधील इसम हे bjp चे माजी नगरसेवक आहेत. जर मान्यवर लोकप्रतिनिधी असे करत असतील तर कर्मचारी यांना वाली कोण असा प्रश्न उपस्थित राहत आहे.


सदर घटनेची पूर्ण माहिती pmpml cmd मा.ओमप्रकाश बकोरिया साहेब यांना कळवल्या नंतर साहेबांनी स्वतः पुणे पोलीस कमिशनर यांच्याशी फोनद्वारे संवाद साधून दोषींनाविरोधत कडक कारवाई करून गुन्हा नोंद करण्यास सांगितला आहे.

Pmpml cmd मा. बकोरिया साहेब यांनी दाखवलेल्या तत्परतेला मनापासून सलाम… 🙏🏻
स्वारगेट डेपोतील चालक देशमाने यांना ससून हॉस्पिटल येथे प्रथमपोचार चालू आहेत. त्यांची प्रकृती ठीक आहे.
अशे वारंवार घडणारे प्रकार हे अतिशय माणुसकीला काळिमा फासणारे आहेत. पोलीस प्रशासनाने या बाबत कडक भूमिका घेणे गरजेचे आहे. तसेच सर्वांचे लक्ष  याच्यावर काही कारवाई होणार का याच्याकडे वेधलेले आहे.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख