Skip to main content

  • Home
  • क्राईम
  • फायनान्स वाल्याने प्रलंबित हप्ता मागितल्याने‌ हप्ता घेण्याच्या कारणाने गावी बोलवुन मारहाण केली. 
Image

फायनान्स वाल्याने प्रलंबित हप्ता मागितल्याने‌ हप्ता घेण्याच्या कारणाने गावी बोलवुन मारहाण केली. 

प्रतिनिधी – फिरोज भालदार

छोलामंडल फायनान्स मध्ये सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून नोकरी करीत असलेल्या किसन संभाजी पवार यांनी नवनाथ भरत जांभळे रा. वासुंदे यांला छोलामंडल फायनान्स कंपनीकडून रेनॉल्ड ड्रीपर गाडी घेण्यासाठी चार लाख रुपये लोन घेतले होते व त्यातील एक हप्ता प्रलंबित असल्याने किसन पवार यांनी नवनाथ भरत जांभळे यांचे भाऊ संदीप भरत जांभळे यांच्याशी ह्या विषयी बोलणे चालू होते . याचदरम्यान संदीप याने किसन यांना 14 /3/ 2023 रोजी खराडेवाडी ता. बारामती जि. पुणे गावचे हद्दीत बारामती गेट हॉटेल समोर हप्ता घेण्यासाठी बोलावले किसन यांचे कलेक्शन करणारे ऋषिकेश याने किसन यांना बोलावल्याने किसन पवार हे त्यांचा छोलामंडल फायनान्स चा हप्ता घेण्यासाठी तेथे गेले.

 तेथे संदीप जांभळे व त्यांच्यासोबत सहा ते सात जण त्यावेळेस तिथे उभे होते . तेवढ्यात त्यातील एका व्यक्तीने पवार हयोच का अशी ओळख विचारली असता तेवढ्यात संदीप याने हाच तो पवार असे म्हणून त्याच्या हातातील लोखंडी कोयत्याने किसन यांच्या डोक्याच्या डाव्या बाजूवर वार केला व दुसऱ्या साथीदारांनी हाताने लाथा बुक्क्यांनी तोंडावर छातीवर मारहाण केली व त्यावेळी संदीप याने किसन यांना तू हप्ता किंवा गाडी यासंदर्भात पुन्हा काही विचारपूस केली तर व इकडे कुठे दिसलास तर जीवानिशी जाशील असे म्हणून किसन यांना पुन्हा कोयता मारला तो किसन यांनी हुकावला त्यावेळी ऋषिकेश काळे हे कशाला त्यांना मारताय आपण काय आहे ती चर्चा करून मिटवुया असे म्हणाल्यावर त्यालाही संदिप व त्याचे साथीदारांकडून हाताने मारहाण केली .

यावरून किसन पवार यांना जखमा झाल्या आहेत त्यांना बारामती हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करण्यात आलेले आहे .व संदीप जांभळे यांच्याविरुद्ध किसन पवार यांनी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनमध्ये कलम 326, 143 ,147 ,148 ,149, आर्म अॅकट 4 / 25 नुसार फिर्याद दाखल केली आहे. तसेच पुढील तपास सुपा दूरशेत्र सहाय्यक पोलीस फौजदार शेंडगे हे करीत आहेत .

Releated Posts

लोणीकंद गोळीबार व सोने चोरी प्रकरणातील फरार आरोपी मध्यप्रदेशमधून २४ तासांच्या आत जेरबंद

प्रतिनिधी लोणीकंद परिसरातील वाडेबोल्हाई येथे एका व्यावसायिकावर गोळीबार करून २२ तोळे सोने जबरीने चोरून नेणाऱ्या कुख्यात आरोपींना पुणे…

ByBymnewsmarathi Aug 8, 2026

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला तात्काळ अटक

 प्रतिनिधी :   वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तसेच जीवे मारण्याची धमकी देत…

ByBymnewsmarathi Aug 5, 2026

महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा पाठलाग करून मारहाण; लग्न होऊ देणार नाही, जीवे मारण्याची धमकी, तरुणावर गुन्हा

अक्षय थोरात: महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिचा रस्ता अडवणे, जबरदस्तीने स्कुटीवर बसण्यास भाग पाडणे, मारहाण करणे, हात…

ByBymnewsmarathi Aug 4, 2026

महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा पाठलाग करून मारहाण; लग्न होऊ देणार नाही, जीवे मारण्याची धमकी, तरुणावर गुन्हा

अक्षय थोरात: महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिचा रस्ता अडवणे, जबरदस्तीने स्कुटीवर बसण्यास भाग पाडणे, मारहाण करणे, हात…

ByBymnewsmarathi Aug 4, 2026