प्रतिनिधी
पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संतोष दादा चौधरी यांच्या यांच्या सूचनेवरून महाराष्ट्र राज्यातील महिलांना रोजगार मिळावा या हेतूने तालुका आणि गाव पातळीवरती रोजगार मेळावे आयोजित करावे संघटनेचे राष्ट्रीय जनसंपर्क प्रमुख जी .एम. भगत सर यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्हा महिला अध्यक्ष विजयाताई कर्णवर यांच्या प्रयत्नातून महिलांना रोजगार उद्योग मेळावा मीटिंग मिळावा हे हेतूने करमाळा तालुका जेऊर येथे अगरबत्ती उद्योग काही दिवसात चालू करण्यात येणार आहे.
त्याची माहिती देण्यासाठी आणि रोजगार मिळवून देण्यासाठी सौ.ज्योतीताई नारायण (आबा)पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सौ .शारदाताई गादिया ,दीप्ती मॅडम कल्याणम अगरबत्ती उद्योजिका आणि पूजा गुरव मॅडम पश्चिम महाराष्ट्र महिला उपाध्यक्ष पोलीस मित्र संघटन सविताताई शिंदे , संदीप भगत प्रसिद्ध प्रमुख माढा तालुका याच्या उपस्थित पार पडला.कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा पूजन करून सुरुवात करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांचे सत्कार करण्यात आले नंतर दीप्ती मॅडम यांनी अगरबत्ती उद्योगा विषयी माहिती सांगितली आणि महिलांना कच्चा माल पुरवठा करून तयार झालेला माल खरेदी करण्यासाठी ग्वाही दिली आणि संपूर्ण मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की आम्ही तुम्हाला कच्चा माल देऊन तयार झालेला कामाला आम्ही घेऊन जाऊ तो मार्केटला विक्रीसाठी पाठवण्यात येईल अशा पद्धतीने महिलांना मार्गदर्शन केले.
महाराष्ट्र महिला उपाध्यक्ष पूजाताई गुरव यांनी पोलीस मित्र संघटनेची माहिती सांगितली त्यानंतर सविता ताई शिंदे यांनी जेऊर मधील महिला या कष्ट करू आहेत त्या तुम्हाला वेळेवर माल पोहोच करतील असे सांगितले नंतर लोकनेत्या ज्योतीताई पाटील यांनी हा उद्योग चांगला आहे हा उद्योग सर्वांनी करा जिथे तुम्हाला अडचण येईल तिथे आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असे सांगून आलेल्या सर्वांचे स्वागत केले या कार्यक्रमात बचतगट अध्यक्ष, सचिव व अनेक महिला हजर होत्या .शेवटी भाग्यश्री मॅडम यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रम संपवण्यात आला .