निंबुत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी.

Uncategorized सामाजिक

संपादक मधुकर बनसोडे.
भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांची 132 वी जयंती मोठ्या उत्साहात निंबूत येते साजरी करण्यात आली.


मिलिंद तरुण मंडळ च्या सर्व सदस्य पदाधिकारी यांनी अस्थिस्मारक जेजुरी येथून धम्मज्योत पायी नींबूत येथे आणली होती निंबुत मध्ये धम्म ज्योतीचे आगमन सकाळी नऊ वाजता झाले.

यावेळी ढोल, ताशा,हलगी, या पारंपारिक वाद्यांचा वापर करण्यात आला. सकाळी दहा वाजता बौद्ध विहार नींबूत येथे धम्म वंदना घेण्यात आली. यावेळी छोट्या छोट्या मुलांनी आपले मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमासाठी सतीश काकडे, प्रमोद काकडे, उदय काकडे, नींबूत ग्रामपंचायत उपसरपंच अमर काकडे, नंदकुमार काकडे, वार्ताहर संभाजी काकडे, ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार काकडे. निंबुत ग्रामपंचायत सरपंच निर्मलाताई काळे, सदस्य कुमोदिनी काकडे, विद्यादेवी काकडे, ग्रामसेवक राठोड भाऊसाहेब, क्लार्क भाऊसो कोळेकर, आधी सदस्य कर्मचारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


आज सायंकाळी सहा वाजता चंदूकाका सराफ अँड सन्स प्रा.लि. यांच्या वतीने मिलिंद तरुण मंडळ नींबूत यांच्या विशेष प्रयत्नातून खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती मिलिंद तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रशांत बनसोडे यांनी दिली