मुख्य मजकुरावर जा
Tuesday, 25 August 2026

// व्हॉट्सॲप आणि सोशल मीडियावर ओपन ग्राफचे डिस्क्रिप्शन (og:description) काढून टाकणारा कोड function mnm_remove_og_description( $presentation ) { if ( isset( $presentation->open_graph_description ) ) { $presentation->open_graph_description = ''; } return $presentation; } add_filter( 'wpseo_frontend_presentation', 'mnm_remove_og_description' );

राष्ट्रीय एकता दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्युरो कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दुर्मिळ छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन खासदार संजयकाका पाटील यांच्या हस्ते उद्या होणार

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
October 30, 2022 1 मिनिट वाचन 8,504 वाचन

संपादक मधुकर बनसोडे

राष्ट्रीय एकता दिनानिमित्त माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय कोल्हापूर आणि मध्य रेल्वे पुणे मंडल यांच्या संयुक्त विद्यमाने सरदार वल्लभभाई पटेल यांचा जीवनपट उलगडून दाखवणाऱ्या दुर्मिळ छायाचित्रांच्या विभागस्तरीय प्रदर्शनाचे उद्घाटन उद्या 31 ऑक्टोबर 2022 रोजी खासदार श्री संजयकाका पाटील यांच्या हस्ते तसेच सांगलीचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांच्या उपस्थितीत मिरज जंक्शन येथे सकाळी 10 वाजता संपन्न होईल.

हे प्रदर्शन 2 नोव्हेंबरपर्यंत सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामुल्य खुले आहे.

यावेळी विविध कलापथकांद्वारे सांस्कृतिक कार्यक्रम तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावरील माहिती मल्टीमीडिया माध्यमातून उपस्थितांना घेता येईल. भव्य कट आउट तसेच सेल्फी बूथ देखील प्रवाशांसाठी आकर्षणाचा विषय ठरतील अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली.देशाच्या एकीकरणाचे शिल्पकार असलेल्या सरदार पटेल यांच्या जीवनाची सर्वसामान्यांना दुर्मिळ छायाचित्रांच्या माध्यमातून माहिती घेता यावी या उद्देशाने हे छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

जास्तीत जास्त नागरिक, इतिहास अभ्यासक, संशोधक, स्पर्धा परिक्षाचे विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी या विभागस्तरीय छायाचित्र प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन क्षेत्रीय प्रचार अधिकारी महेश चोपडे यांनी केले आहे.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख