• Home
  • इतर
  • इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल – उद्योग मंत्री उदय सामंत*
Image

इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल – उद्योग मंत्री उदय सामंत*

प्रतिनिधी.

पुणे दिनांक २०: रांजणगांव येथील औद्योगिक वसाहतीत इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर (इएमसी) प्रकल्पाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात लघु उद्योग सुरू होऊन तरुणांना रोजगार मिळेल, असे प्रतिपादन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज केले.

रांजणगांव औद्योगिक वसाहत येथील रिया हाऊस येथे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर (इएमसी) व चाकण व तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील पायाभूत सुविधासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ पुणे क्षेत्राचे मुख्य अभियंता नितीन वानखेडे, अधीक्षक अभियंता आर.एस. गावडे, कार्यकारी अभियंता दिलीप जोगवे, मारुती कालकुटकी, संजय कोतवाड, प्रादेशिक अधिकारी सचिन बारवकर आणि स्थानिक उद्योग समूहातील प्रतिनिधी उपस्थित होते.

श्री. सामंत म्हणाले, रांजणगांव औद्योगिक वसाहतीत केंद्र शासनाने इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर प्रकल्प मंजूर केला आहे. हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रकल्प असून या प्रकल्पाच्या पायाभूत सुविधांसाठी राज्य शासनाने ३४७ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्याचबरोबर ६५० कोटी रुपयांचा निधी पाईप लाईनसाठी मंजूर केला आहे. प्लग आणि प्लेचे ६० युनिट सुरू करण्यात येत आहेत. त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्यास ५० एकर जागेत हे क्षेत्र वाढवण्याचा मानस आहे.

उद्योग संघटनेने मागणी केलेल्या कौशल्य केंद्रासाठी व कामगार रुग्णालयासाठी प्रत्येकी ५ एकर जागा तसेच पोलिस विभागाच्या कार्यालयासाठी जागा देण्याचे मंजूर केले आहे. पथदिव्यांसाठी १४ कोटी, अंतर्गत रस्त्यासाठी १५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. भविष्यात या ठिकाणी हेलिपॅड, कामगारांच्या निवासाची सोय करण्यात येईल.

उद्योगांना पोषक वातावरण तयार करण्यासाठी शासनाचे सर्वोपोतरी सहकार्य राहील. राज्यात मोठ्या प्रमाणात उद्योग यावेत यासाठी शासन पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. उद्योगाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीसाठी उद्योगांना सोई सुविधा, सवलती देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. येथील उद्योगांनी स्थानिक तरुणांना रोजगार देण्यासाठी प्राधान्य दिले पाहिजे. उद्योगांची वाढ होत असताना परिसरातील रस्ते, पायाभूत सुविधा वाढत असतात. त्याप्रमाणेच तेथील तरुणांनाही रोजगार मिळाल्यास अशा उद्योगांच्या मागे तेथील स्थानिक युवक उभे राहतील असे सांगून इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर प्रकल्प वेळेत पूर्ण करावा, अशा सूचना श्री. सामंत यांनी दिल्या.

यावेळी मुख्य अभियंता श्री. वानखेडे यांनी प्रकल्पाबद्दल माहिती दिली.

Releated Posts

पॅशनला प्रोफेशन बनवून स्वत:ला उच्च स्थानावर घेऊन जा; मनीष खन्ना यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

प्रतिनिधी. युईआय कलिनरी कॉम्पिटिशनचे दिमाखात उद्घाटन; देशभरातील 9 कॅम्पसमधील सुमारे 150 विद्यार्थ्यांचा सहभाग हॉस्पिटॅलिटी आणि बिझनेस मॅनेजमेंट क्षेत्रातील…

ByBymnewsmarathi Dec 19, 2025

अंधेरीत फ्लश टॅंकमधून सापडले शेकडो ‘ब्लँक वोटर ID कार्ड ‘!!! चर्चा आणि चौकशीची मागणी वाढली

प्रतिनिधी अंधेरी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका इमारतीतील बाथरूमच्या फ्लश टॅंकमध्ये शेकडो कोरे (ब्लँक) मतदार…

ByBymnewsmarathi Nov 22, 2025

राज्यात यंदाचा गाळप हंगाम १ नोव्हेंबर पासून सुरू करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १० आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ५ रुपये कपातीचा निर्णय राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने नुकसान…

ByBymnewsmarathi Sep 30, 2025

राष्ट्रीय महाकाल सेनेचा झंजावत बारामती मध्ये

बारामती मध्ये दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी श्री महाकाल सेना सेवा संस्थान यांची राष्ट्रीय महाकाल सेनेची पहिली आढावा…

ByBymnewsmarathi Sep 22, 2025