मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Thursday, 20 August 2026
|
महाराष्ट्र: ...
बाजार: SENSEX 81,100 ▲ NIFTY 24,800 ▲
M NEWS MARATHI

अन्याया विरुद्ध आवाज उठवणारा एकमेव चॅनल

महसूल न्यायालयातील अर्धन्यायिक प्रकरणाबाबत भोर येथे ११ मे रोजी विशेष लोकन्यायालयाचे आयोजन

mnewsmarathi प्रतिनिधी
May 4, 2023 1 मिनिटांचे वाचन 5004 वेळा पाहिले

प्रतिनिधी

 महसूल न्यायालयातील अर्धन्यायिक प्रकरणावर तडजोडीने निकाली काढण्याकरीता भोर उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे गुरुवार ११ मे रोजी सकाळी ११ वाजता विशेष लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे.

उपविभागीय अधिकारी कार्यालय, भोर यांच्यासमोरील अर्धन्यायिक, अपील कामकाजामधील अर्धन्यायिक, अपील प्रकरणे विशेष लोकन्यायालयामध्ये घेण्यात येणार आहेत. या विशेष लोक न्यायालयामध्ये सुनावणीदरम्यान तडजोडनामा दाखल केल्यानंतर त्याच दिवशी अर्धन्यायिक, अपील प्रकरणामध्ये निर्णय पारित करण्यात येणार आहे.

या लोकन्यालयामध्ये तडजोडीसाठी ११ प्रकरणाची सद्यस्थितीत नोंदणी झाली आहे. विधीज्ञ, अशील, पक्षकारांनी विशेष लोक न्यायालयामध्ये सहभाग नोंदवून अधिकाधिक महसुली प्रकरणे निकाली काढण्यास सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी केले आहे.

mnewsmarathi

हे लेखक M NEWS MARATHI साठी उत्कृष्ट पत्रकारिता करत आहेत.

सर्व लेख पहा