• Home
  • क्राईम
  • बारामती तालुका पोलिसांची धडाकेबाज कामगिरी दरोडा टाकणारे गुन्हेगार गुन्हा दाखल होताच 53,00,000 रुपये मुद्देमाला सह दोन तासात घेतले ताब्यात*
Image

बारामती तालुका पोलिसांची धडाकेबाज कामगिरी दरोडा टाकणारे गुन्हेगार गुन्हा दाखल होताच 53,00,000 रुपये मुद्देमाला सह दोन तासात घेतले ताब्यात*

प्रतिनिधी

दिनांक 9/ 5 /2023 रोजी फिर्यादी श्री मारुती मोतीलाल करांडे वय 30 वर्ष धंदा व्यवसाय राहणार आसंगी तालुका जत जिल्हा सांगली. यांनी बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली की फिर्यादी यांच्या मालकीचा अशोक लेलँड 40 18 मालवाहतूक टेलर नंबर N L 01 A B 35 77 या टेलर मध्ये माऊली कृपा ट्रान्सपोर्ट मार्फत कल्याणी स्टील कंपनी गिणगीरा होस्पेट कर्नाटक येथून लोखंडी रॉड मुंढवा पुणे येथील भारत फोर्स कंपनीमध्ये घेऊन जाण्यासाठी सोलापूर पुणे हायवे वरून जात असताना भिगवन गावच्या पुढे बबीता ढाबा येथे रात्री 03.00 वाजण्याच्या सुमारास जेवणासाठी थांबले असता जेवण वगैरे झाल्यानंतर गाडीमध्ये ड्रायव्हर फिर्यादी स्वतः झोपलेले असताना टेलरच्या दरवाजा उघडून तीन इसम ट्रेलरच्या केबिनमध्ये आले. बाकीचे तीन एसएम खाली उभा राहिले ड्रायव्हरला दमदाटी करून त्याचे चार हजार रुपये काढून घेतले व मोबाईल देखील काढून घेतला व ट्रेलर चालू करून तो बारामतीच्या दिशेने घेऊन निघाले. पुढे या सर्वांनी मिळून तो ट्रेलर कनेरी तालुका बारामती या गावाच्या दिशेने आणला तेथे आल्यानंतर ड्रायव्हरला गाडीतून खाली उतरून त्याला मोटरसायकलवर अज्ञात स्थळी घेऊन गेले व गाडी पालखी महामार्गाचे काम चालू असलेल्या ठिकाणाचे बाजूला उभी करून गाडीमध्ये असणारा 53 लाखाचा मुद्देमाल लोखंडी रॉड एकूण 112 हे दुसऱ्या ट्रक मध्ये लोड करून दुसरीकडे घेऊन जाऊन विकण्याचा त्यांचा हेतू होता.
सदरचे फिर्यादी यांनी घडलेला प्रकार बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे येऊन सांगितला.
घडलेल्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री प्रभाकर मोरे यांनी तात्काळ पोसई लेंडवे व पोलीस स्टेशनचे तपास पथक तात्काळ गाडीचा शोध घेणे कामी योग्य त्या सूचना देऊन रवाना केले. पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे काम चालू असतानाच तालुका पोलिसांनी तत्परता दाखवून मुद्देमाला सहित ट्रेलर व तेथे जागेवर दोन दरोडेखोर यांना पकडले तसेच त्यांच्याकडून इतर त्यांच्या साथीदारांची माहिती घेऊन तेथेच आजूबाजूला असणारे बाकीचे त्यांचे साथीदार यांना झाडे झुडपातून उसाच्या रानातून पाठलाग करून मोठ्या सीतापीने एकूण सहा दरोडेखोरांना बारामती तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले त्यांची

नावे पुढीलप्रमाणे..
1 दिग्विजय श्रीकांत जाधव वय 21 वर्ष राहणार उदमेवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे
2 प्रथमेश मनोज शेलार वय 23 वर्षे राहणार घोलप वाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे
3 लक्ष्मण भीमराव कुचेकर वय 30 वर्ष राहणार उद मायवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे
4 मयूर प्रकाश शिंदे व 28 वर्ष राहणार तावशी तालुका इंदापूर जिल्हा पुणे
5 सुहास रावसाहेब थोरात व 28 वर्षे राहणार उदमाई वाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे
6 स्वप्निल दत्तात्रय निंबाळकर वय 28 वर्षे राहणार 39 फाटा संसार तालुका इंदापूर जिल्हा पुणे
वरील सर्व गुन्हेगार यांना अटक करण्यात आलेली असून त्यांना आज रोजी माननीय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सो बारामती यांचे कोर्टात हजर केले असता दिनांक 12/5/23 रोजी पर्यंत त्यांना पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे.
या आरोपींनी यासारखे आणखी काही गुन्हे केले आहेत काय सदर चोरीचा माल हे कोणाला देतात याबाबत सखोल तपास बारामती तालुका पोलीस करीत आहेत
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री अंकित गोयल साहेब पुणे ग्रामीण , अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे साहेब बारामती विभाग पुणे ग्रामीण . उपविभागीय पोलिस अधिकारी श्री गणेश इंगळे साहेब बारामती विभाग. यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री प्रभाकर मोरे, पोसई डी.बी. लेंडवे तपास पथक अंमलदार राम कानगुडे . पोलीस कॉन्स्टेबल शशिकांत दळवी, संतोष मखरे, सहाय्यक फौजदार शिंगाडे, गायकवाड पोलीस हवालदार अतुल पाटसकर पोलीस कॉन्स्टेबल तुषार लोंढे , दीपक दराडे, अजित भाग्यवंत यांनी केली आहे. सदर गुन्ह्यांचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक डी बी लेंडवे बारामती तालुका पोलीस स्टेशन हे करीत आहेत .

Releated Posts

15 वर्षांनी न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय कस्टडीत मृत्यू प्रकरणात 9 पोलिसांना दिली जन्मठेप शिक्षा.

प्रतिनिधी पोलीस कोठडीत संशयिताचा मृत्यू झाल्याप्रकरणी वाशिमच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने 15 वर्षांनंतर ऐतिहासिक निर्णय देत रिसोड…

ByBymnewsmarathi Jul 3, 2026

अवैध हातभट्टी बंद… मात्र परवानाधारक दारूच्या अवैध विक्रीला उधाण?

प्रतिनिधी एक्साईज विभाग आणि पोलिसांच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष हडपसर परिसरात अवैध दारूच्या सेवनामुळे झालेल्या मृत्यूच्या घटनेनंतर राज्यभरात पोलिस…

ByBymnewsmarathi Jul 3, 2026

मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीसह आश्रय देणाऱ्या इसमाला गुन्हे शाखा युनिट-५ कडून अटक!

प्रतिनिधी: वानवडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोक्का (MCOCA) गुन्ह्यात गेल्या १ वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला आणि त्याला आश्रय…

ByBymnewsmarathi Jul 2, 2026

​मेढद येथे माळेगाव पोलिसांची मोठी कारवाई; साडेतीन लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

सहसंपादक- अक्षय थोरात पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल आणि अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांच्या आदेशानुसार, माळेगाव…

ByBymnewsmarathi Jul 1, 2026