मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 8 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
माझा जिल्हा

बरकत नगर येथे झालेल्या दुर्घटनेत मृत्यू व जखमी झालेल्या नागरिकांची प्रदीप मुंडे यांच्याकडून विचारपूस!

mnewsmarathi 10 May 2023 1 मिनिट वाचन 8,640 वाचन

परळी वैजनाथ प्रतिनिधी

परळी शहरातील बरकत नगर येथे गॅसच्या टाकीचा स्फोट होऊन एक युवक आणि चार गंभीर जखमी झालेल्या नागरिकांची भेट घेऊन नागापूर जिल्हा परिषदेचे सदस्य प्रदीप मुंडे यांनी सांत्वन व विचारपूस केली.

     दिनांक 9 मे रोजी बरकत नगर येथे अचानक गॅसच्या टाकीचा स्फोट होऊन 14 वर्षीय युवक आदिल उस्मान शेख याचा पोटाला मार लागल्यामुळे जागीच मृत्यू झाला तसेच शमशाद बी सय्यद हकीम आणि शेख आवेश गौस यांच्यासह इतर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या कुटुंबाची त्यांनी भेट घेऊन विचारपूस केली तसेच इथून पुढे अशा दुर्दैवी घटना घडू नयेत म्हणून नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

    यावेळी मकसूद भाई , रिहाना बी ,निजुद्दीन खतीब भाई,शेख बाबा, सय्यद यासीन ,शेख अहमद भाई, शेख खतीब भाई,शेख नजीर भाई,शेख जमील भाई,शेख अफरोज भाई,शेख खाजा बाबामिया आदिसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi