माळेगाव पोलिसांनी नागरिकांचे हरवलेले मोबाईल दिले शोधून. नागरिकांनी मानले पोलीस प्रशासनाचे आभार.

क्राईम

 प्रतिनिधी

माळेगाव पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात नागरिकांचे हरविलेले/गहाळ मोबाईलचे शोध होणे साठी माळेगाव पोलीस स्टेशन कडे प्राप्त झालेल्या तक्रारींचे अनुषंगाने मा.श्री.अंकित गोयल सो (पोलीस अधीक्षक , पुणे ग्रामीण), मा श्री.आनंद भोईटे सो. (अपर पोलीस अधीक्षक सो, बारामती विभाग), तसेच मा.श्री.गणेश इंगळे सो. (उपविभागीय पोलीस अधिकारी सो. बारामती उपविभाग यांनी नागरिकांचे गहाळ चे मोबाईल संदर्भाने वेळोवेळी केलेले मार्गदर्शन तसेच माळेगाव पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्री.किरण अवचर सो यांचे आदेशाने पोलीस नाईक ज्ञानेश्वर सानप गोपनीय विभाग, माळेगाव पोलीस स्टेशन यांनी गहाळ मोबाईल संदर्भाने पोलीस निरीक्षक खानापुरे, सायबर सेल पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण यांचे कडून प्राप्त माहितीचे तांत्रिक विश्र्लेशन करून एकूण रक्कम रुपये ७९०००/- रुपये किंमतीचे एकूण ७ मोबाईल चा शोध घेवून त्यापैकी

१) श्री.हेमंत उत्तम वाघमोडे रा शिवनगर माळेगाव ता बारामती

२) श्री.मनोज पांडुरंग झेंडे रा २२ फाटा खांडज ता बारामती

३) चि.समीर सुरेश जाधव रा लक्ष्मीनगर निंबुत ता बारामती

४) चि.श्रेयस दीपक कोकरे रा आबाजीनगर धुमाळवाडी ता बारामती अशा चार तक्रारदार यांना आज रोजी तक्रार दिनाचे औचित्य साधून त्यांचे मोबाईल श्री. किरण अवचर सो यांचे हस्ते परत केलेले आहेत.

  तसेच यापूर्वी

१) श्री प्रफुल्ल जयवंत भोसले रा. निरावागज ता.बारामती

२) सौ.वृषाली दगडे रा.बारवनगर कांबळेश्वर ता. बारामती

३) श्री.रोहित कृष्णराव जगताप रा पवईमाळ ता बारामती यांचे मोबाईल त्यांना माळेगाव पोलीस स्टेशन कडून परत मिळवून दिलेले आहेत.

          मोबाईल परत मिळाले मुळे नागरिकांनी माळेगाव पोलीस स्टेशन आभार मानलेले आहेत.