Image

फळबाग लागवड अंतर्गत शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन

प्रतिनिधी

कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हवामान आधारित फळबाग लागवड अंतर्गत शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे करण्यात आले.

 यावेळी आत्माचे प्रकल्प संचालक विजय हिरेमठ, तालुका कृषि अधिकारी सुप्रिया बांदल, हवामान संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. संजय मोरे कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ.धीरज शिंदे आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ. संजय मोरे यांनी भारतीय हवामानाची व पर्जन्यमानाची विस्तृत माहिती देवून चालू हंगामात हवामान विभागाकडील पर्जन्यमान अंदाज व हवामान बदलाबाबतच्या अंदाजाची माहिती दिली. फळबाग लागवड करताना हवेतील आर्द्रता, कोरडी हवा, हवेचा वेग किती असावा, कोणती फळपीक घ्यावे, हवामानात होणाऱ्या बदलामुळे पिकांमध्ये किडींचा रोग मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढतो याचीही त्यांनी माहिती दिली.

डॉ.धीरज शिंदे यांनीही उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणास तालुक्यातील फळबाग लागवड करणारे शेतकरी उपस्थित होते.

Releated Posts

स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार प्रदान, दै. पुढारीचे पत्रकार काशिनाथ पिंगळे यांना पत्रकारितेतील पुरस्कार

प्रतिनिधी पुणे येथील स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्ताने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार २०२६’ मंगळवार…

ByBymnewsmarathi Jul 10, 2026

“‘भराव नको, पूल बांधा’ : सोनकसवाडीचा पाझर तलाव वाचवण्यासाठी ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा”

  प्रतिनिधी बारामती-फलटण नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या बांधकामामुळे सोनकसवाडी (ता. बारामती) येथील पाझर तलावाच्या अस्तित्वावर संकट निर्माण झाल्याचा…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मावळमधील पाटण येथे घरांवर दरड कोसळली; कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, NDRF कडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू, पुणे-मुंबई हायवेवरील वाहतूक पूर्णपणे बंद!

​प्रतिनिधी मावळ तालुक्यातील पाटण गावात आज (६ जुलै) पहाटेच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. सतत सुरू…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या वतीनं श्रीक्षेत्र पंढरपूर येथे उभारण्यात आलेल्या धर्मशाळेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन.

उपसंपादक- अक्षय थोरात  मंचर आणि आंबेगाव तालुक्यातील ग्रामस्थांनी उभारलेली ही सुसज्ज धर्मशाळा हजारो वारकऱ्यांसाठी हक्काचा निवारा ठरेल आणि…

ByBymnewsmarathi Jul 4, 2026