गुंड प्रवृत्तीचे पाथरकर बंधू वर दोन गंभीर गुन्हे दाखल.

क्राईम

प्रतिनिधि

आमराई भागामध्ये धनंजय पाथरकर सचिन पाथरकर लाला पाथरकर या तिघांची तसेच त्यांच्या इतर नातेवाईकांची ते कायम जेलमध्ये आत बाहेर येत असतात त्यांना प्रचलित कायद्याप्रमाणे भीती राहिलेली नसल्याने त्यांची त्या भागात दहशत आहे. काल आपापसात त्यांच्यातच भांडण झाले लाला पाथरकर याला सचिन आत्माराम पाथरकर धनाजी आत्माराम पाथरकर अमर पाथरकर यांनी डोक्यात मारहाण केली तो जखमी झाला.

तो पोलीस ठाण्यात सचिन आत्माराम पाथरकर धनाजी आत्माराम पाथरकर व अमर विरुद्ध तक्रार देत असताना. पोलीस स्टेशन मध्येच त्यांनी त्याने तक्रार देऊ नये म्हणून त्याला दम बाजी सुरू केली. पोलिसांशीही त्यांनी हुज्जत घातली. पोलीस त्याला कायद्याची भीती घालत असताना तो अरेरावी करत होता. सचिन पाथरकर व धनाजी पाथरकर यांची मुजोरगिरी मोडीत काढण्यासाठी व त्यांनी लाला पाथरकर याने त्याला जीव मारण्याचा प्रयत्न केला म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. तसेच त्यांनी पोलिसां बरोबर सुद्धा हुज्जत घालून कायद्याचा अवमान केला म्हणून त्याच्यावर सुद्धा गंभीर कलमाप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. त्या दोघांना पोलीस खाक्या दाखवून रात्री अतिरिक्त कुमक बोलून त्यांना पोलीस कोठडीमध्ये डांबण्यात आलेले आहे.

आज त्यांना माननीय न्यायालयासमोर उभे करून पोलीस कोठडी रिमांड घेण्यात येणार आहे तसेच नंतर रात्री लाला पाथरकर यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात वर्ग करून घेण्यात येऊन त्यांच्यावर कठोर स्वरूपाची प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे. काही दिवसापूर्वी अशीच कारवाई एका मळ्द गुंडावर सुद्धा करण्यात आलेली होती. पोलीस कुणाच्याही दहशतीला भीक न घालता कायदेशीर मार्गाने गुन्हेगारांवर कारवाई करणार आहे. दोन्ही गुन्ह्यांचा तपास पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक युवराज घोडके व सहाय्यक पोलीस निरीक्षक पालवे हे तपास पथकाच्या मदतीने करत आहेत.