रस्त्यावर लावलेल्या 50 वाहनांवर वाहतूक शाखेकडून कारवाई

क्राईम

प्रतिनिधी

बारामती शहरामध्ये रस्ते विसरून असले तरीसुद्धा व्यावसायिक गाळ्यांसमोर पार्किंगला बंदी असताना सुद्धा चार चाकी वाहने लावली जातात त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना रस्त्याने चालताना अडथळे निर्माण होतात. त्या अनुषंगाने वाहतूक शाखेने मोहीम हाती घेतलेल्या असून वाहतूक शाखेतर्फे सहाय्यक पोलीस निरीक्षक बिराप्पा लातूर यांच्या नेतृत्वाखाली फिरवून कारवाई करण्यासाठी पथक नेमण्यात आलेले आहे. तसेच चौकाचौकात लावलेल्या वाहतूक पोलिसांना सुद्धा पर पोलीस अधीक्षक माननीय आनंद मोहिते यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. याबाबत माननीय उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे हे नियंत्रण ठेवत आहेत. दोन दिवसात वाहतूक शाखेने एकूण 90 रस्त्याला लावणाऱ्या वाहनावर कारवाई केलेली आहे त्यामध्ये काल 50 वाहनावर कारवाई केली. वाहतूक अधिनियम कलम 122 117 प्रमाणे कारवाई करण्यात आलेली असून भादवी कलम 283 प्रमाणे चार केसेस दाखल करण्यात आलेले आहेत.

सर्व वाहतूकदारांना विनंती करण्यात येते की आपले वाहन पार्किंग स्थळीच लावा. शहरामध्ये मार्केटच्या वरती अध्यायावत पार्किंग दुमजली बनवण्यात आलेले आहे त्या ठिकाणी आपले वाहने लावावी ही नम्र विनंती व कारवाईपासून वाचावे.