बारामती शहरात गावठी पिस्तूल व तलवारी जप्त

क्राईम

प्रतिनिधी

बारामती शहरात माननीय पोलीस अधीक्षक अंकित गोयल व अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी बारामती शहर पोलिसांना बारामती हे विकसित शहर असून त्यामध्ये वारंवार विविध कारणावरून नागरिकरण झाल्याने भांडण होत असते या भांडणामध्ये कुठेही अग्निशास्त्र किंवा हत्यारांचा वापर होऊ नये म्हणून कायम गोपनीय माहिती काढून कारवाई करण्याबाबत आदेश दिलेले आहेत.

सदर आदेशाचे पालन करण्यासाठी बारामती शहर पोलीस प्रयत्नशील असतात काल दिनांक अकरा जून रोजी शहर पोलीसाना यांना माहिती मिळाली की वडकी नगर आमराई येथील ईसमनामे. नेहल उर्फ रावण विजय दामोदर वय 23 वर्ष वडकी नगर आमराई बारामती याच्या घरामध्ये गावठी पिस्टल व तलवारी ठेवलेले आहेत अशी माहिती मिळाली. सदर माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी तात्काळ सदर इसमाची घरझडती घेण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ पोलीस हवालदार कल्याण खांडेकर पोलीस नाईक दशरथ कोळेकर पोलीस शिपाई अक्षय सिताब तुषार चव्हाण दशरथ इंगवले पोलीस हवालदार शिंदे जामदार यांना आदेश दिले आणि घरा मध्ये एक गावठी पिस्तूल व मॅक्झिम एक जिवंत काडतुस तसेच पाच धारदार तलवारी मिळून आल्या. सदर इसमावर भारतीय हत्यार कायदा कलम 3 25 27 4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर इसमाला माननीय न्यायाधीश अण्णासाहेब गिरे यांच्या कोर्टात हजर केले असता त्याला दोन दिवस पोलीस कोठडी मिळालेली आहे. सदर पिस्तूल चा वापर कुठे झाला आहे का याबाबत आणखी तपास सुरू आहे तसेच सदर पिस्तल हे त्याने का जवळ बाळगले याहीबाबत खातर जमा करण्याची कारवाई सुरू असून सदर हत्यारे त्याला कोणी दिली याबाबत सखोल तपास सुरू आहे.

अशा अवैध हत्यारे बाळगण्याबाबतची जर माहिती कुणाकडे असेल तर त्याने पोलीस स्टेशनची संपर्क करावा कुठल्याही प्रकारे त्याचे नाव उघड केले जाणार नाही.