मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 8 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
माझा जिल्हा

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जिल्हास्तरीय जयंती उत्सव समितीची शुक्रवारी महत्वपुर्ण बैठक

mnewsmarathi 10 Jul 2023 1 मिनिट वाचन 8,591 वाचन

प्रतिनिधी

समाजबांधवांनी बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन

वाशिम – साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या येत्या १ ऑगष्ट रोजी जयंतीनिमित्त साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जिल्हास्तरीय जयंती उत्सव समिती वाशिम नोंदणी क्र. महा/१९५/२०२२ च्या वतीने जिल्हास्तरीय जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यासह विविध पदाधिकारी आणि सदस्यांची निवड करण्यासाठी शुक्रवार, १४ जुलै रोजी दुपारी १.३५ वाजता स्थानिक शासकीय विश्राम भवन येथे एका महत्वपुर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

  सदर महत्वपुर्ण बैठकीत अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव जिल्हाभरात उत्साहात साजरा करण्यासाठी पदाधिकार्‍यांच्या निवडीसह जिल्ह्यात घेण्यात येणारे विविध सामाजीक कार्यक्रम आणि भव्य मिरवणूकीच्या नियोजनाविषयी चर्चाविमर्श करुन सर्वसंमतीने निर्णय घेण्यात येईल. तरी सदर महत्वपुर्ण जिल्हास्तरीय बैठकीला जिल्हयातील समस्त मातंग समाजबांधवांनी बहूसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जिल्हास्तरीय जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

लेखक

mnewsmarathi

M News Marathi