Skip to main content

  • Home
  • माझा जिल्हा
  • पुणे जिल्ह्यातील युरिया व डीएपी खताचा संरक्षित साठा मुक्त
Image

पुणे जिल्ह्यातील युरिया व डीएपी खताचा संरक्षित साठा मुक्त

प्रतिनिधी

पुणे जिल्ह्यात खरीप हंगामात शेतकऱ्यांना खताची टंचाई भासू नये याकरिता युरिया खताचा २७२२.६५० व डीएपी खताचा ९१२.२०० मे. टन संरक्षित साठा करण्यात आला आहे. संरक्षित साठ्या मधून १०० टक्के डीएपी व ५० टक्के युरिया जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने वितरित करण्यास मान्यता मिळाली आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी संजय काचोळे यांनी दिली आहे.

जिल्ह्यातील तालुका निहाय मुक्त केलेला संक्षित साठा (मे.टन मध्ये): आंबेगाव – युरीया ११६.१०० मे. टन, डी.ए.पी. ५०.२०० मे. टन, मुळशी – युरीया ५४.९००, डी.ए.पी. ३०, जुन्नर – युरीया १०१.२५०, डी.ए.पी. ८५, मावळ- युरीया १६२.९००, डी.ए.पी. ५५, खेड – युरीया ११४.०७५, डी.ए.पी. ७८, शिरुर- युरीया १२५.७७५, डी.ए.पी. १००, दौंड – युरीया १६४.४७५, डी.ए.पी. १०१, पुरंदर – युरीया ७४.७००, डी.ए.पी. ५३, हवेली युरीया ३९.६००, डी.ए.पी. २०, भोर- युरीया ७५, डी.ए.पी. ४९, वेल्हा- युरीया ४०.९५०, डी.ए.पी. २०, इंदापूर -युरीया १४१.९७५, डी.ए.पी. १४४ आणि बारामती तालुका युरीया १४९.६२५ आणि डी.ए.पी. १२७ इतका संरक्षित साठा मुक्त करण्यात आला आहे.

जुलै महिन्यामध्ये जिल्ह्यातील पश्चिमेकडील पट्ट्यामधील भात लागवड सुरू असल्याने व जिल्ह्यातील उर्वरित भागात पाऊस सुरू झाल्याने खरीप पेरण्याची कामे चालू असून खताची मागणी वाढत असून त्यादृष्टीने वितरण व्यवस्था करण्यात येणार असल्याचेही कळविण्यात आले आहे

Releated Posts

निरा–बारामती मार्गावरील एसटी चालकांच्या गैरवर्तनाच्या तक्रारी; कारवाईची मागणी

प्रतिनिधी मानवाधिकार संरक्षण समितीचे बारामती आगार व्यवस्थापकांना निवेदन निरा–बारामती मार्गावर सेवा देणाऱ्या काही एसटी बसचालकांकडून प्रवाशांशी उद्धट वर्तन,…

ByBymnewsmarathi Aug 11, 2026

भूमिहीनांच्या हक्काचा ५६ वर्षांचा प्रश्न अजूनही अधांतरी; १४ ऑगस्टपासून हलगीनाद आंदोलनाचा इशारा

प्रतिनिधी- अक्षय थोरात उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना निवेदन; प्रशासनाने आंदोलनापूर्वी लेखी निर्णय देण्याची भारत तुपे यांची मागणी माळेगाव…

ByBymnewsmarathi Aug 8, 2026

भूमिहीनांच्या हक्काचा ५६ वर्षांचा प्रश्न अजूनही अधांतरी; १४ ऑगस्टपासून हलगीनाद आंदोलनाचा इशारा

 प्रतिनिधी :   उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना निवेदन; प्रशासनाने आंदोलनापूर्वी लेखी निर्णय देण्याची भारत तुपे यांची मागणी माळेगाव…

ByBymnewsmarathi Aug 8, 2026

स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार प्रदान, दै. पुढारीचे पत्रकार काशिनाथ पिंगळे यांना पत्रकारितेतील पुरस्कार

प्रतिनिधी पुणे येथील स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्ताने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार २०२६’ मंगळवार…

ByBymnewsmarathi Jul 10, 2026