• Home
  • माझा जिल्हा
  • संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
Image

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

प्रतिनिधी

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या राज्य शासन व केंद्र शासनाच्या राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त आणि विकास महामंडळाकडील (एन.एस.एफ.डी.सी.) विविध योजनांचा अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील इच्छुकांना लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील (चांभार, ढोर, होलार, मोची आदी) नागरिकांच्या आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी विविध कर्ज योजना राबविण्यात येतात. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरिता ४ हजार ८०० लाभार्थ्यांना कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

एन.एस.एफ.डी.सी. नवी दिल्ली यांच्या मुदती कर्ज योजनेअंतर्गत लघु उद्योगासाठी १ लाख रुपये, १ लाख ५० हजार रुपये, आणि २ लाख रुपये, चर्मोद्योगासाठी २ लाख रुपये, लघुऋण वित्त योजना व महिला समृद्धी योजना प्रत्येकी ५० हजार रुपये या योजनांसाठी मागील प्रलंबित प्रकरणाकरीता २२ कोटी २१ लाख रुपये इतका निधी प्राप्त झालेला आहे.

२०२३-२४ या आर्थिक वर्षात एन.एस.एफ.डी.सी. यांच्या मुदती कर्ज योजने अंतर्गत लघु उद्योगासाठी ५ लाख रुपये, लघुऋण वित्त योजना व महिला समृद्धी योजना प्रत्येकी १ लाख ४० हजार रुपये तसेच नवीन महिला अधिकारिता योजनेकरीता ५ लाख रुपये या योजना मंजूर झाल्या आहेत.

शैक्षणिक कर्ज योजनेमध्ये वाढ झाली असून भारतामध्ये शिक्षणासाठी २० लाख रुपये व विदेशामध्ये ३० लाख रुपयांपर्यंत कर्ज मंजूर करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी नजीकच्या महामंडळाच्या जिल्हा कार्यालयास भेट द्यावी, असे संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये यांनी कळविले आहे.

Releated Posts

स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार प्रदान, दै. पुढारीचे पत्रकार काशिनाथ पिंगळे यांना पत्रकारितेतील पुरस्कार

प्रतिनिधी पुणे येथील स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्ताने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार २०२६’ मंगळवार…

ByBymnewsmarathi Jul 10, 2026

“‘भराव नको, पूल बांधा’ : सोनकसवाडीचा पाझर तलाव वाचवण्यासाठी ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा”

  प्रतिनिधी बारामती-फलटण नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या बांधकामामुळे सोनकसवाडी (ता. बारामती) येथील पाझर तलावाच्या अस्तित्वावर संकट निर्माण झाल्याचा…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मावळमधील पाटण येथे घरांवर दरड कोसळली; कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, NDRF कडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू, पुणे-मुंबई हायवेवरील वाहतूक पूर्णपणे बंद!

​प्रतिनिधी मावळ तालुक्यातील पाटण गावात आज (६ जुलै) पहाटेच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. सतत सुरू…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या वतीनं श्रीक्षेत्र पंढरपूर येथे उभारण्यात आलेल्या धर्मशाळेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन.

उपसंपादक- अक्षय थोरात  मंचर आणि आंबेगाव तालुक्यातील ग्रामस्थांनी उभारलेली ही सुसज्ज धर्मशाळा हजारो वारकऱ्यांसाठी हक्काचा निवारा ठरेल आणि…

ByBymnewsmarathi Jul 4, 2026