करंजे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

माझा जिल्हा

प्रतिनिधी

 मा.श्री अजितदादा पवारसो उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या वाढदिवसानिमित्त सोमेश्वर सेवाभावी संस्था, सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट, व सोमेश्वर पंचक्रोशीतील कार्यकर्ते यांचे वतीने सोमेश्वर देवस्थान करंजे येथे अभिषेक व केक कापून साजरा करण्यात आला.

या प्रसंगी सोमेश्वर कारखान्याचे चेअरमन मा.श्री पुरूषोत्तमदादा जगताप, प्रमोदकाका काकङे सभापती बांधकाम व आरोग्य पुणे, उधोजक संतोषराव कोंढाळकर सोमेश्वर संचालक संग्रामभाऊ सोरटे यांच्या हस्ते सोमेश्वर देवस्थान पुरोहित ॠषीकाका घोलप यांनी सोमेश्वर चरणीअभिषेक केला.

पुरूषोत्तमदादा जगताप यांनी देवस्थान ट्रस्ट चेअरमन प्रतापराव भांङवलकर व सचिव संतोष भांङवलकर यांच्याशी देवस्थान बाबतीत चालवलेल्या विकास कामाबद्दल संवाद साधला.तसेच जनरल मिटींग मध्ये सभासद मंङळींनी ठराव केल्या प्रमाणे दरवर्षी टनाला 1 रूपया सोमेश्वर देवस्थान विकास निधी कपात करण्याचा निर्णय झाला आहे.तसेच शेंङकरवाङी ङॅमचे पाणी देऊळवाङी परिसरातील लोकांना येणार आहे.त्यामूळे जुनी पाणी पुरवठा लिफ्ट कारखाना चालवणार आहे.

व तसेच त्या पाणी योजनेचे पाणी सोमेश्वर देवस्थानला पुरवठा करण्यात येणार आहे.देवस्थान परिसरातील बाग बगीचा झाङे यांना उपयोगी पडेल.व सोमेश्वर देवस्थान एक प्रेक्षणीय पर्यटन स्थळ बनेल.कार्यक्रमास शैलेश रासकर संचालक सोमेश्वर कारखाना, तानाजीराव भापकर, रूपचंद शेंङकर मा.संचालक सोमेश्वर , बाळासाहेब शिंदे संचालक निरा बाजार समिती,शिवाजीराव शेंङकर,महेंद्र शेंङकर,मोहनराव भांङवलकर, सुखदेवराव शिंदे चेअरमन सोमेश्वर सेवा भावी संस्था, मेजर पोपटराव हूंबरे अध्यक्ष बहूजन समाज सेवा संघ करंजे , राहूल भांङवलकर व सोमेश्वर पंचक्रोशीतील कार्यकर्ते उपस्थित होते.