प्रतिनिधी – फिरोज भालदार
दि. २७/०७/२०२३ रोजी दुपारी ३ वा . सुमारास मौजे करंजे पूल ता. बारामती जि. पुणे गावच्या हद्दीमध्ये एक पांढरा रंगाचा छोटा हत्ती गाडी नं . एम. एच. १२ एस . एक्स ४८९३ यामध्ये नामे ऋषिकेश गजानन पोरे रा. वॉर्ड नं. ३ निरा ता. पुरंदर जि. पुणे यानी विनापरवाना अवैद्य रित्या प्रतिबंधित केलेला असुरक्षित गुटखा , पान मसाला, सुगंधित तंबाखू याचे विक्रीच्या हेतूने जवळ बाळगून गाडीमध्ये प्रवास करत वाहतूक करीत असताना. वडगाव निंबाळकर करंजेपुल पोलीसांना आढळून आले.
आढळून आलेला माल 1)३९६०/-रूपये किंमतीचा विमल पान मसाला ३३ पिवळा केसरी रंगाचे पुडे त्यावर केसरयुक्त पान मसाला असे लिहलेले,प्रत्येकी पुडयाची किं १२० रू,त्यामधील एका पुडयामध्ये ३० पाऊच.
2) ११९६८/- रूपये किंमतीचा विमल पान मसाला ६४ हिरव्या रंगाचे पुडे,त्यावर केसरयुक्त पान मसाला असे लिहलेले,प्रत्येकी पुडयाची किं १८७ रू त्यामधील एका पुडयामध्ये ४७ पाऊच .
3)९५०४/- रूपये किंमतीचा विमल पान मसाला ४८ जांभळे रंगाचे पुडे,त्यावर केसरयुक्त पान मसाला असे लिहलेले प्रत्येकी पुडयाची किं १९८ रू त्यामधील एका पुडयामध्ये ४७ पाऊच .
4)१४४००/- रू किंमतीचा आर.एम.डी.पान मसाला,निळा,लाल रंगाचे १६ बाँक्स,प्रत्येकी बाँक्सची किं ९०० रू त्यामधील एका बाँक्समध्ये ६० पाऊच .
5)३००००/- रू किंमतीची टाटा कंपनीची पांढरे रंगाची ए.सी.ई.गोल्ड छोटा हत्ती गाडी नं.एम.एच.१२ एस.एक्स ४८९३
ह्याप्रमाणे माल आढळून आला आहे .
महाराष्ट्र शासनाच्या वतीने अन्नसुरक्षा आयुक्त अन्न व औषध प्रशासन मुंबई यांनी अन्नसुरक्षा व मानके कायदा २००६ अन्वये प्रतिबंधित केलेला असुरक्षित गुटखा वाहतूक करीत असताना आढळून आला. त्याचे विरुद्ध वडगाव निंबाळकर पो. कॉ.पोपट बाळू नाळे यांनी फिर्याद दिली. ऋषिकेश गजानन पोरे त्याचे विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ३२८, १८८, २७२, २७३ सह अन्नसुरक्षा व मानदे कायदा २००६ चे कलम २६ (२)(i),२६ (२)(ii),२६(२) (iv),२७ (३)(d),३०(२)(a),५९ प्रमाणे कायदेशीर तक्रार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तरी पुढील तपासणी पोसई शेलार हे करीत आहेत.