मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 8 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
माझा जिल्हा

लासुर्णे गावात झाला पोलीस भरती झालेल्या गुणवतांचा सत्कार…

mnewsmarathi 31 Jul 2023 1 मिनिट वाचन 9,805 वाचन

प्रतिनिधी

                       दि ‌.३१ जुलै २०२३ , सोमवार रोजी सकाळी १० वाजता लासुर्णे येथील नागनालंदा बुध्दविहार येथे लासुर्णे गावातील विशेषतः राजवाडा येथील आकांक्षा राहुल लोंढे, सौ.प्रतिक्षा दत्तात्रय लोंढे, भिमराव मोहन कांबळे यांनी स्पर्धा परीक्षेत यश संपादन करून महाराष्ट्र पोलीस पदी निवड झाल्याबद्दल लासुर्णे ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

                यावेळी “मी आंबेडकरवादी” सामाजिक संघटनेचे अध्यक्ष सुरज वनसाळे, ॲड. मंगेश लोंढे यांनी सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा व्यक्त केल्या . तर सत्काराला उत्तर देताना भिमराव कांबळे व सौ.प्रतिक्षा लोंढे यांनी आपल्या यशाची यशोगाथा सांगितली. या गुणवंतांनी अनेक अपयश सुध्दा पचवले आहे. मात्र अपयशाच्या मागेच यश लपलेले असते यश आले म्हणून कोणी हुरळून जायचे नाही व अपयश आले म्हणून कोणी खचून जायचे नाही कारण ह्या नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत त्यामुळे अपयश आलेल्या सर्वच विद्यार्थ्यांनी पुन्हा जोमाने आपले प्रयत्न केला पाहिजे हे या सर्वांनी दाखवुन दिले. या सर्वांनी जिद्द, चिकाटी, सातत्य ठेवुन यश खेचून आणले.

                        यावेळी संतोष (पिपा)लोंढे, दिपक रामचंद्र लोंढे, अनिल पाटील, भाऊराव लोंढे, विजय लोंढे, विनोद(बापु) लोंढे, विनायक लोंढे, सर्जेराव लोंढे, भागवत लोंढे, आबा बनसोडे, महेश रूपनवर, सुधीर लोंढे, संतोष तोरणे, बिटु माने, खोमणे सर,रोहन लोंढे, दत्तात्रय लोंढे, राहुल लोंढे, साजन लोंढे, सचिन लोंढे , सुखदेव झेंडे,प्रशांत जवंजाळ, विशाल पवार, विनोद जाधव, शंकर लोंढे, धर्मेंद्र लोंढे, विश्वास लोंढे, मामा लोंढे, बबलु गायकवाड, विशाल चव्हाण, नवनाथ लोंढे, मयुर मोरे,, शिंदे दाजी, बाळु लोंढे, सिध्दार्थ लोंढे, कमलेश पेठाडे,व असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

                  हा कार्यक्रम लासुर्णे ग्रामपंचायत सदस्य संतोष (पिपा)लोंढे , दिपक रामचंद्र लोंढे, अनिल प्रतापराव पाटील यांनी आयोजित केला होता व सुत्रसंचलन संतोष (पिपा)लोंढे यांनी केले

लेखक

mnewsmarathi

M News Marathi