मुख्य मजकुरावर जा
Friday, 28 August 2026

स्विफ्ट आणि लुना धडक होऊन एकाचा मृत्यू माळेगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
November 9, 2022 1 मिनिट वाचन 8,506 वाचन

प्रतिनिधी- सोपान कुचेकर

माळेगाव-08/11/2022 रोजी कऱ्हावागज येथील तुकाई चौकात भर दुपारी बारा साडेबाराच्या सुमारास स्विफ्ट गाडी आणि लुना मध्ये टक्कर होऊन एकाचा मृत्यू झालाशिवाजी शंकर खोमणे यांनी सांगितलेल्या माहितीनुसार स्विफ्ट गाडी चालवणारा शुभम संतोष लंबाते रा. उपळते ता. फलटण जि. सातारा याने गाडी चालवताना नियमांचे उल्लंघन करीत कुठलीही परवा न करता हाय गयीने अविचारणे गाडी चालवून लुना चालवणारे बाळासाहेब शंकर खोमणे यांना धडक दिली या धडकेत डोक्याला तसेच हातापायांना मार व गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला या धडकेत शेजारी असलेल्या होंडा अमेझ कार चे खूप मोठे नुकसान झाले आहे अशी माहिती शिवाजी शंकर खोमणे यांनी देऊन गुन्हा नोंद करण्यात आला.या गुन्ह्याचा पुढील अधिक तपास दाखल अंमलदार -पो. हवा. मोहिते तपासी अंमलदार- पो .ना. सय्यद हे अधिक तपास करीत आहेत

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख