Skip to main content

Image

निंबुत येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा.

प्रतिनिधी.

 15 ऑगस्ट 76 वा स्वातंत्र्य दिन नींबूत येथे आज विविध ठिकाणी ध्वजारोहण करून साजरा करण्यात आला.

 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निंबूत येथे सकाळी साडेसात वाजता नींबूत ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, शाळा व्यवस्थापन समिती, पालक व ग्रामस्थ शिक्षक विद्यार्थी यांच्या समवेत ध्वजारोहण करण्यात आले.

 तसेच साहेबराव दादा विकास सोसायटी येथे, देखील ध्वजारोहण करण्यात आले. ग्रामपंचायत येथे सरपंच निर्मलाताई काळे, ग्रामपंचायत सदस्य कुमाताई काकडे, यांच्यासह अन्य मान्यवरांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्याचप्रमाणे पशुवैद्यकीय दवाखाना या ठिकाणी मुकुंदराव काकडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले बा.सा.काकडे विद्यालय निंबुत येथे पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रमोद भगवानराव काकडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले

 यावेळी गावातील ज्येष्ठ मंडळी तरुण वर्ग महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निंबुत येथील विद्यार्थ्यांना श्री गौतम शहाजीराव काकडे यांच्याकडून टाय, बेल्ट, आय कार्ड वाटप करण्यात आले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांसाठी ग्रामपंचायत निंबूत कडून खाऊचे वाटप करण्यात आले.

 यावेळी एकमेकांना पेढे भरवून आनंद उत्सव साजरा करण्यात आला.

Releated Posts

भूमिहीनांच्या हक्काचा ५६ वर्षांचा प्रश्न अजूनही अधांतरी; १४ ऑगस्टपासून हलगीनाद आंदोलनाचा इशारा

प्रतिनिधी- अक्षय थोरात उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना निवेदन; प्रशासनाने आंदोलनापूर्वी लेखी निर्णय देण्याची भारत तुपे यांची मागणी माळेगाव…

ByBymnewsmarathi Aug 8, 2026

भूमिहीनांच्या हक्काचा ५६ वर्षांचा प्रश्न अजूनही अधांतरी; १४ ऑगस्टपासून हलगीनाद आंदोलनाचा इशारा

 प्रतिनिधी :   उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना निवेदन; प्रशासनाने आंदोलनापूर्वी लेखी निर्णय देण्याची भारत तुपे यांची मागणी माळेगाव…

ByBymnewsmarathi Aug 8, 2026

स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार प्रदान, दै. पुढारीचे पत्रकार काशिनाथ पिंगळे यांना पत्रकारितेतील पुरस्कार

प्रतिनिधी पुणे येथील स्पंदन बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्ताने ‘हिंदवी स्वराज्य गौरव पुरस्कार २०२६’ मंगळवार…

ByBymnewsmarathi Jul 10, 2026

“‘भराव नको, पूल बांधा’ : सोनकसवाडीचा पाझर तलाव वाचवण्यासाठी ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा”

  प्रतिनिधी बारामती-फलटण नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या बांधकामामुळे सोनकसवाडी (ता. बारामती) येथील पाझर तलावाच्या अस्तित्वावर संकट निर्माण झाल्याचा…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026