प्रतिनिधी – सोपान कुचेकर
पिंपरे बुद्रुक आणि पिंपरे खुर्द यांच्यामधील निरा नदीवर जो बंदरा आहे त्याला संरक्षण कठडे नसल्याने या बंधाऱ्यावरून ये जा करताना रात्री अपरात्री जीव मुठीत घेऊन भीतीदायक करावा लागतोय प्रवास. प्रवास करताना नागरिकांची खूप दमछाक होत आहे. याकडे संबंधित अधिकारी प्रशासन का लक्ष देत नाही असा सवाल नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. सुरुवातीला या बंधाऱ्यावरती संरक्षण कठडी बसविण्यात आले होते परंतु पुराच्या पाण्याने वाहून गेले ?म्हणजे सुरुवातीला कठड्यांची गरज होती आता नाही का ? एखादा अपघात झाल्यानंतरच संबंधित अधिकारी प्रशासनास जाग येईल का ? अशी चर्चा दोन्ही पिंपरेकर यांच्यात जोरात चर्चा चालू आहे.
पिंपरे खुर्द आणि पिंपरे बुद्रुक यांना जोडणारा नदी निरावरील बंधारा दळणवळणासाठी खूप महत्त्वाचा आहे .जास्त करून शेतकरी वर्ग हा मोठ्या प्रमाणावर असल्याने या बंधाऱ्याचा दळणवळणासाठी खूप उपयोग होत आहे पण जीव मुठीत घेऊन. आंदोरी, मरेचीवाडी, बावकरवाडी, चव्हाण वस्ती, पिंपळाचा मळा ,लोणंद आणि इतर गाहून निरीकडे जाण्यासाठी किंवा पुण्याकडे जाण्यासाठी या बंधाऱ्याचा खूप मोठा उपयोग होत आहे परंतु जीव मुठीत घेऊन कारण संरक्षण कठडे नाहीत.
संरक्षण कडे का बसवली जात नाहीत असा सवाल उपस्थित होत आहे. पिंपरे खुर्द पिंपरे बुद्रुक या दोन्ही लोकांच्या शेती अलीकडे पलीकडे आहेत. शेताकडे ये जा करण्यासाठी याच संरक्षण नसलेल्या बंधाऱ्याहून जीव मुठीत घेऊन ये जा करावी लागते. निरा बाजारपेठ मोठी असल्याने आठवडे बाजार तसेच रोज भाजीपाला मार्केट साठी शेतकरी वर्ग याच कठडे नसलेल्या बंधार्याचा आधार घेऊन दळणवळण करत आहे. लहान मोठ्या वर्गातील शाळकरी मुले मुली देखील याच संरक्षण नसलेल्या कठड्याचा आधार घेऊन ये जा करीत आहेत. एका बाजूने टू व्हीलर गाडी आली तर दुसऱ्या बाजूने चालत येणाऱ्या माणसाला जीव मुठीत घेऊनच ये जा करावी लागत आहे याकडे संबंधित प्रशासन कधी लक्ष देणार अशी नागरिकांमध्ये जोरात चर्चा चालू आहे. पावसाळा संपल्यानंतर संरक्षण कठडे नसलेल्या बंधाऱ्यावर आत्ता पाणी अडवण्याचे काम चालू आहे असे दिसत आहे. हे काम करत असताना संरक्षण कठडे बसवन्या संबंधित अधिकारी प्रशासनाच्या लक्षात येत नाही का?
एखादा अपघात झाल्यावरच लक्षात येईल ? रात्री अपरात्री या संरक्षण कठडे नसलेल्या बंधाऱ्यावरून शेतकरी वर्ग जीव मुठीत घेऊन दळणवळण करीत आहेत. बंदरा अरुंद असल्याने वाहनधारक तसेच पायी चालणाऱ्यांना संरक्षण कठडे नसल्याने धोकादायक ठरत आहे. बंधाऱ्याला संरक्षण कठडे उभे करावीत तसेच संबंधित प्रशासनाने याकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे आणि अपघात न होता लोकांचे संरक्षण व्हावे अशी मागणी जनतेतून होत आहे