मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Thursday, 22 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
इतर

दोन कोटी रुपयांचे आयफोन मोबाईल चोरीचा गुन्हा केला उघड.

mnewsmarathi 28 Aug 2023 1 मिनिट वाचन 9,188 वाचन

प्रतिनिधी

लोणीकंद केसनंद रोडवर असणा-या एका गोडावून मधुन एकुण अॅपल कंपनीचे २६६ मोबाईल फोन दि. १७/७/२०२३ चे चोरून नेण्यात आले होते. सदर घरफोडीच्या अनुशंगाने लोणीकंद पोलीस स्टेशन गु.र.नं. ५८०/२०२३ भादवि कलम ४५४,४५७.३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याचे तपासात मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली झारखंड मधील साहेबगंज जिल्ह्यातील काही टोळया सक्रीय असल्याची माहिती मिळाली त्यावरून त्या माहितीचे विश्लेषण करुन त्या अनुशंगाने साहेबगंज जिल्ह्यातून माहिती मिळवून लोणीकंद पोस्टेचे पोलीस अंमलदार अजित फरांदे आणि अमोल ढोणे यांना तपासकामी साहेबगंज येथे पाठविले असता त्यांना यातील पाहिजे आरोपी नामे सलीम उर्फ असराउल इस्माईल फजल शेख, वय ३५ वर्षे, रा. मध्य पियारपुर, तहसिल उधवा, ठाणा राधानगर, जिल्हा साहेबगंज, राज्य झारखंड यास सदर गुन्ह्याचे तपासकामी अटक करुन दिनांक २४/०८/२०२३ रोजी लोणीकंद पोलीस स्टेशनला आणले आहे. सदर आरोपीकडे विचारपुस केल्यानंतर त्याने इतर चार सहका-यांचे मदतीने सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले असुन सदर गुन्हयातील चोरीला गेलेला मुद्देमाल हा पश्चिम बंगाल मधील एका एजंटच्या मार्फतीने विकला असल्याची माहीती दिली असुन उर्वरीत आरोपींचा व चोरीचा माल घेणा-या इसमांचा पोलीसांकडुन शोध सुरु आहे. पुढील तपास सपोनि जाधव हे करीत आहेत.

सदर कामगीरी मा. अपर पालीस आयुक्त श्री रंजन कुमार शर्मा, मा. पोलीस उपायुक्त परि-४ श्री शशिकांत बोराटे मा. राहा. पोलीस आयुक्त श्री. संजय पाटील, वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विश्वजीत काइंगडे लोणीकंद पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सपोनि रविंद्र गोडसे, सपोनि गजानन जाधव, पोलीस अंमलदार स्वप्निल जाधव, कैलास साळुंके, अजित फरांदे, अमोल ढोणे, साईनाथ रोकडे यांनी केली

लेखक

mnewsmarathi

M News Marathi