सोमेश्वर विद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा
महत्त्वाचे मुद्दे
- १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
- २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
- ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.
– प्रतिनिधी
हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस व राष्ट्रीय क्रीडा दिन आंबी बुद्रुक येथील सोमेश्वर विद्यालयात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
विद्यालयाचे क्रीडा शिक्षक संतोष जेधे यांनी शालेय जीवनात खेळांचे महत्व या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी कबड्डी, खो खो, उंच उडी, गोळाफेक, बॅडमिंटन, टेनिक्वाईट असे मैदानी खेळ तर बुद्धिबळ, कॅरम असे इनडोअर खेळ खेळले. योगेश महाले व सुभाष तिटकारे यांनी अतिथी पंच म्हणून काम पाहिले. जेष्ठ शिक्षक चंद्रकांत होळकर, हेमंत गडकरी, सोमनाथ डगळे, प्रिया भोसले यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.
