• Home
  • क्राईम
  • बारामती ! सुपा पोलिसांची दमदार कामगिरी ; अवैधरित्या विनापरवाना वाळूचा उपसा करून वाहतूक करणाऱ्यांना सुपा पोलिसांनी केले जेरबंद .
Image

बारामती ! सुपा पोलिसांची दमदार कामगिरी ; अवैधरित्या विनापरवाना वाळूचा उपसा करून वाहतूक करणाऱ्यांना सुपा पोलिसांनी केले जेरबंद .

प्रतिनिधी – फिरोज भालदार

दि. ३०/०८/२०२३ रोजी पहाटे ३ वा. चे सुमारास सुपा पोलीस स्टेशन हददीतील मौजे काराटी गावचे हददीत करहा नदी पात्रामध्ये अवैदय रित्या वाळू उपसा चालु असलेबाबत गोपनीय माहीती प्राप्त झालेने सुपा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी नागनाथ पाटील , राहुल भाग्यवंत , पो. अंमलदार सचिन दरेकर, होमगार्ड धायगुडे असे मिळुन खाजगी वाहनाने रवाना होवुन मौजे काऱ्हाटी गावातुन जळगाव या गावाकडे जाणारे रस्त्याचे कडेला अंधारात दबा धरून बसलेले होते , ३ .३० वा. चे दरम्यान जळगावकडुन गावातुन दोन संशयीत ट्रक लाईट बंद करून काऱ्हाटी गावचे दिशेने येताना निदर्शनास आले.

संशयीत ट्रकला हात करून थांबावुन पोलिसांनी चालकाकडे चौकशी केली असता दोन्ही ट्रकमध्ये अवैदयरित्या विना परवाना वाळु असल्याचे निष्पन्न झाले. अवैदय वाळु वाहतुक करणारे ट्रक चालक यांचेकडे विचारणा केली असता, त्यांनी सदरचे ट्रकचे मालक हे पाठीमागे स्विप्ट गाडीमध्ये आहेत असे सांगीतले सदरची स्विप्ट कार नं. एम. एच १२ एन.ई. ७८८१ व त्यातील दोन व्यक्तींना ताब्यात घेवुन सुपा पोलीस स्टेशन येथे आणुन ट्रक चालक
१) महेश राजेंद्र यादव रा. मुरूम ता. उमरगा जि. उस्मानाबाद
२) चेतन मारूती वाबळे रा. उरुळी कांचन ता. हवेली जि. पुणे, ट्रक मालक
३) आकाश रावसाहेब व्यवहारे रा. लोणी काळभोर ता. हवेली जि. पुणे
४) नामदेव पोपट वाघमोडे रा. उरुळीकांचन ता. हवेली जि. पुणे व वाळु भरून देणारे
५) देवा जगताप रा. जळगाव ता. बारामती जि. पुणे याचे विरुध्द भारतीय दंड संहिता कलम ३७९,३४ पर्यावरण सरंक्षण J अधिनियम कलम ९,१५ सार्वजनिक मालमत्ता नुकसान कायदा कलम ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

सदर कारवाईमध्ये १० ब्रास वाळु किंमत अंदाजे ८०,०००/- रू टाटा कंपनीचा ट्रक नं. एम.एच. १२.डी. जी. ०४४२, टाटा कंपनीचा ट्रक नं. एम एच १२ एन. एक्स. ३४३३ अशा दोन ट्रक किं.अं. ३०,००,०००/-रू, एक स्विप्ट कार नं. एम. एच.१२ एन.ई. ७८८१ किं अं. ३,००,०००/- असा एकुण ३३.८०,००० /- रूपयाचा मुददेमाल जप्त करण्यात आले आहेत. यातील चार आरोपींना अटक करण्यात आली व ०१ आरोपी फरार आहे. सदर गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान लवटे हे करीत आहेत.

सदरची कारवाई ही अंकित गोयल सो पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण तसेच अपर पोलीस अधिक्षक आनंद भोईटे सो बारामती विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे सो उपविभाग बारामती, सुपा पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, पोलीस उप निरीक्षक समाधान लवटे, पोलीस उप निरीक्षक पांडुरंग कन्हेरे, सहा. फौजदार रविंद्र मोहोरकर, पो. हवा राहुल भाग्यवंत, पो. ना अनिल दणाणे, पो. ना. संदिप लोंढे, पो.कॉ सचिन दरेकर, पो.कॉ. तुषार जैनक, होमगार्ड दिपक धायगुडे, होमगार्ड रविंद्र धायगुडे यांनी केली आहे.

Releated Posts

​मेढद येथे माळेगाव पोलिसांची मोठी कारवाई; साडेतीन लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

सहसंपादक- अक्षय थोरात पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल आणि अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांच्या आदेशानुसार, माळेगाव…

ByBymnewsmarathi Jul 1, 2026

दोन गावठी पिस्तूल, एक रायफलसह आरोपी जेरबंद; माळेगाव पोलिसांची धडक कारवाई

प्रतिनिधी माळेगाव पोलिसांनी अवैध शस्त्रास्त्रांविरोधात कारवाई करत दोन गावठी पिस्तूल, एक रायफल, दोन जिवंत काडतुसे तसेच दोन काडतुसांचे…

ByBymnewsmarathi Jun 15, 2026

रागाच्या भरात नातवाने आजोबांचा लोखंडी गजाने केला खून; आरोपी नातू पोलिसांच्या ताब्यात

प्रतिनिधी   शिरूर तालुक्यातील बाभुळसर बुद्रुक येथे शेतातील व घरातील कामे सांगितल्याच्या रागातून २६ वर्षीय नातवाने ८४ वर्षीय…

ByBymnewsmarathi Jun 15, 2026

बारामतीत म्हशींच्या 12 रेडकांची क्रूर वाहतूक उघड; पिकअपसह चालकावर गुन्हा दाखल

सहसंपादक- अक्षय थोरात बारामती तालुक्यातील पाहुणेवाडी परिसरात म्हशींच्या रेडकांची कथितपणे क्रूर व बेकायदेशीर वाहतूक केल्याप्रकरणी माळेगाव पोलिसांनी एका…

ByBymnewsmarathi Jun 14, 2026