• Home
  • इतर
  • 21/11/2022 रोजीभारतीय युवा पँथर संघटना बारामती नगर परिषदेसमोर करणार बेमुदत धरणे आंदोलन.
Image

21/11/2022 रोजीभारतीय युवा पँथर संघटना बारामती नगर परिषदेसमोर करणार बेमुदत धरणे आंदोलन.

बारामती : दिनांक १५/११/२०२२ बारामती शहरातील भारतरत्न प.पू.डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी हायड्रॉलिक शिडी बसविण्याच्या मागणीचे निवेदन भारतीय युवा पँथर संघटनेचे बारामती शहर अध्यक्ष निखिल भाई खरात यांनी बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांना दिले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना भीम अनुयायी आभिवादन करण्यासाठी आल्यानंतर पुष्पहार अर्पण करण्यासाठी शिडीची गरज आहे.तसेच स्मारकाची स्वच्छता करताना देखील शिडी/ हायड्रॉलिकची गरज आहे .दिनांक १४/०९/२०२२ रोजी याबाबत निवेदन दिले होते. सदर निवेदनावर कोणतीही कारवाई झाली नाही म्हणून सोमवारी दिनांक २१/११/२०२२ रोजी बारामती नगर परिषदेसमोर बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचे देखील निखिल खरात यांनी सांगितले.

सदर निवेदन देताना भारतीय युवा पँथर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शुभम गायकवाड, पुणे जिल्हा उपाध्यक्ष अस्लम वस्ताद शेख, बारामती शहर अध्यक्ष निखिल खरात,संघटनेचे सदस्य विराज औदुते,समीर खान व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Releated Posts

पॅशनला प्रोफेशन बनवून स्वत:ला उच्च स्थानावर घेऊन जा; मनीष खन्ना यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

प्रतिनिधी. युईआय कलिनरी कॉम्पिटिशनचे दिमाखात उद्घाटन; देशभरातील 9 कॅम्पसमधील सुमारे 150 विद्यार्थ्यांचा सहभाग हॉस्पिटॅलिटी आणि बिझनेस मॅनेजमेंट क्षेत्रातील…

ByBymnewsmarathi Dec 19, 2025

अंधेरीत फ्लश टॅंकमधून सापडले शेकडो ‘ब्लँक वोटर ID कार्ड ‘!!! चर्चा आणि चौकशीची मागणी वाढली

प्रतिनिधी अंधेरी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका इमारतीतील बाथरूमच्या फ्लश टॅंकमध्ये शेकडो कोरे (ब्लँक) मतदार…

ByBymnewsmarathi Nov 22, 2025

राज्यात यंदाचा गाळप हंगाम १ नोव्हेंबर पासून सुरू करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १० आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ५ रुपये कपातीचा निर्णय राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने नुकसान…

ByBymnewsmarathi Sep 30, 2025

राष्ट्रीय महाकाल सेनेचा झंजावत बारामती मध्ये

बारामती मध्ये दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी श्री महाकाल सेना सेवा संस्थान यांची राष्ट्रीय महाकाल सेनेची पहिली आढावा…

ByBymnewsmarathi Sep 22, 2025