मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Thursday, 20 August 2026
|
महाराष्ट्र: ...
बाजार: SENSEX 81,100 ▲ NIFTY 24,800 ▲
M NEWS MARATHI

अन्याया विरुद्ध आवाज उठवणारा एकमेव चॅनल

सोमेश्वर कॉलेज परीसरात कोयत्याने दहशत करणाऱ्या आरोपीच्या वडगांव निंबाळकर पोलीसांनी आवळल्या मुसक्या

mnewsmarathi प्रतिनिधी
September 1, 2023 1 मिनिटांचे वाचन 5001 वेळा पाहिले

प्रतिनिधी

मु.सा. काकडे कॉलेज समोरील निरा बारामती रोडवर तेजस उर्फ दादु विजय सवाणे वय २२ वर्षे, रा. वाघळवाडी ता.बारामती जि.पुणे हा हातात लोखंडी कोयता घेवुन मोठ मोठयाने आरडाओरड करुन शालेय मुलांचे समोर दहशत निर्माण असल्याने त्यास पोलीसांनी ताब्यात घेवुन त्याचेकडुन लोखंडी कोयता हस्तगत करून वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशन गु.रजि.नं. ५७० / २०२३ भारतीय हत्यार कायदा कलम ४,२५ सह महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ चे कलम कलम ३७(२), ३७ (३) सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम ११०,११२, ११७ गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सहा पोलीस उपनिरीक्षक डि.एस. वारूळे हे करीत आहेत..

सदरची कामगिरी ही मा. श्री अंकित गोयल सोो पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण, मा. श्री आनंद भोईटे अपर पोलीस अधिक्षक बारामती विभाग, पुणे ग्रामीण, मा. श्री गणेश इंगळे उपविभागीय पोलीस अधिकारी सोो बारामती उपविभाग, बारामती यांचे मार्गदर्शनाखाली वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशनचे श्री सचिन काळे सहा पोलीस निरीक्षक, श्री योगेश शेलार पोलीस उपनिरीक्षक, सहा पोलीस उपनिरीक्षक दिपक वारूळे, पोलीस हवालदार रमेश नागटीळक, अनिल खेडकर, अमोल भोसले, सागर देशमाने, अमोल भुजबळ, पोपट नाळे पोलीस मित्र अजित नलवडे यांनी केली आहे.

टिप :- अशा प्रकारे कोयत्याने दहशत माजविण्यांच्यावर व पसरवाणान्यावर पुणे ग्रामीण हद्दीत कडक कारवाई करण्यात येईल.

mnewsmarathi

हे लेखक M NEWS MARATHI साठी उत्कृष्ट पत्रकारिता करत आहेत.

सर्व लेख पहा