• Home
  • इतर
  • कसबा फलटण चौकात धुडगूस घालणाऱ्या गँग चां म्होरक्या अटक
Image

कसबा फलटण चौकात धुडगूस घालणाऱ्या गँग चां म्होरक्या अटक

प्रतिनिधी सोपान कुचेकर

दिनांक 11 नोव्हेंबर रोजी भर दुपारी पोलीस ठाणे रेकॉर्ड वरील गुन्हेगार आदेश संजय कुचेकर व त्याचे साथीदार साहिल सिकिलगर ऋषिकेश चंदनशिवे तेजस बच्छाव यश जाधव यांनी फलटण चौकातील हॉटेल दुर्वाज यामध्ये जाऊन हॉटेल चालकावर व कामगार यांचे दहशत बसवण्यासाठी व त्याच्याकडून पैसे उकळण्यासाठी हॉटेलमध्ये तोडफोड केली व हॉटेल चालकाच्या डोक्यात धारदार तलवारीने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला यातील फिर्यादी याच्या डोक्यात 13 टाके पडलेले होते. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ ऋषिकेश चंदनशिवे व तेजस बच्छाव यांना अटक केली होती.

आदेश कुचेकर गुन्हा केल्यानंतर मुंबई येथे फरार झालेला होता. तो काल त्याच्या घरी आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली आहे. या सर्व आरोपींच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न खंडणी घराविषयी आगळीक व दंगल या भादवीच्या कलमाप्रमाणे गुन्हा दाखल आहे. (307,384,427,143,147,149 सह अर्म act 4 25)आदेश कुचेकर व त्याची गॅंग या भागात वारंवार गुन्हे करते व त्यांच्यामुळे सदर परिसरात भीतीचे वातावरण असल्याने त्यांच्यावर काही दिवसातच. संघटित गुन्हेगारी थोपपवण्यासाठी करावी लागणारी कारवाई होणार आहे त्याबाबत वरिष्ठांना अहवाल पाठवण्यात येणार आहे.

सदर आरोपीला पोलीस निरीक्षक सुनील महाडिक सपोनी कुलदीप संकपाळ पोलीस नाईक दशरथ कोळेकर पोलीस शिपाई तुषार चव्हाण पोलीस शिपाई जामदार व राणे यांनी केली आहेयाच आदेश कुचेकर यांनी काही महिन्यापूर्वी नितीन वाईन्स या दुकानावर सुद्धा तोडफोड करून हल्ला केलेला होता तसेच एका कसब्यातील युवकालाही मारहाण केलेली होती व ज्या दिवशी हा गुन्हा केला त्याच दिवशी त्यांनी चैत्राली बार मध्ये सुद्धा धुडगूस घातलेला होता परंतु भीतीपोटी अनेक व्यवसायाचे तक्रार देत नाहीत तरी त्यांच्या कुणाच्या तक्रारी असतील त्यांनी पोलीस स्टेशनला संपर्क करावा

Releated Posts

पॅशनला प्रोफेशन बनवून स्वत:ला उच्च स्थानावर घेऊन जा; मनीष खन्ना यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

प्रतिनिधी. युईआय कलिनरी कॉम्पिटिशनचे दिमाखात उद्घाटन; देशभरातील 9 कॅम्पसमधील सुमारे 150 विद्यार्थ्यांचा सहभाग हॉस्पिटॅलिटी आणि बिझनेस मॅनेजमेंट क्षेत्रातील…

ByBymnewsmarathi Dec 19, 2025

अंधेरीत फ्लश टॅंकमधून सापडले शेकडो ‘ब्लँक वोटर ID कार्ड ‘!!! चर्चा आणि चौकशीची मागणी वाढली

प्रतिनिधी अंधेरी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका इमारतीतील बाथरूमच्या फ्लश टॅंकमध्ये शेकडो कोरे (ब्लँक) मतदार…

ByBymnewsmarathi Nov 22, 2025

राज्यात यंदाचा गाळप हंगाम १ नोव्हेंबर पासून सुरू करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रतिनिधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १० आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ५ रुपये कपातीचा निर्णय राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने नुकसान…

ByBymnewsmarathi Sep 30, 2025

राष्ट्रीय महाकाल सेनेचा झंजावत बारामती मध्ये

बारामती मध्ये दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी श्री महाकाल सेना सेवा संस्थान यांची राष्ट्रीय महाकाल सेनेची पहिली आढावा…

ByBymnewsmarathi Sep 22, 2025