पुणे पिंपरीतील गोटा मालक गाई म्हशींचे दूध वाढवण्यासाठी ऑक्सीटोसिन औषधाचा वापर करत असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला तपसत मिळाली होती त्या अनुषंगान ऑक्सीटोसिन औषधाचा वापर करणाऱ्या गोटा मालकांच्या विरोधा पुणे पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे पुणे पिंपरीतील सहा गोठा मालकांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे विठ्ठल भिवाजी झांजर्डे,सागर कैलास सस्ते, विलास महादेव मुरकुटे, सुनील खंडप्पा मलको नाईक, गणेश शंकर पैलवान, महादू नामदेव परांडे अशी अटक करण्यात आलेल्या गोटा मालकांची नावे आहेत. अशा क्रूर विचारांच्या व्यक्तींमुळे अनेक लहान मुले वयोवृद्ध नागरिक व सामान्य जनतेला अनेक गंभीर स्वरूपाच्या आजाराला बळी पडावं लागत आहे? देशातील दुधाचा तुटवडा पाहता प्रशासनाने देखील दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी वेगवेगळ्या योजना अमलात आणल्या पाहिजेत. तसेच दूध खरेदी विक्री करणाऱ्या संघांवरती व खाजगी डेरी चालकांवरती बारकाईने लक्ष संबंधित विभागाने केंद्रित केले पाहिजे. कित्येक जणांचे प्रपंच उध्वस्त करणाऱ्या अशा क्रूर व्यक्तींच्यावरती कडक कारवाई करून अशा व्यक्तींना अथवा अशा व्यक्तींच्या कुटुंबांना भविष्यात पशुपालन करण्यापासून वंचित ठेवले पाहिजे.