संपादक मधुकर बनसोडे.
सोमेश्वर परिसरामध्ये कॉलेज,इंजिनिअरिंग कॉलेज,माध्यमिक शाळा,आहेत संध्याकाळी चार ते पाच या वेळात शाळा कॉलेज सुटल्यामुळे सोमेश्वर येथील बस स्थानकावरती प्रचंड मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे वेळेत बस न आल्यामुळे येणाऱ्या एखाद्या एसटी बस मध्ये सर्व विद्यार्थी बसू शकत नाहीत त्यामुळे किमान निरा ते वडगाव,कोराळे पर्यंत ज्यादा बस शाळा कॉलेज महाविद्यालय सुटण्याच्या वेळेत चालू करण्यात यावी अशी मागणी विद्यार्थी करत आहेत.
वाडी वस्त्यावरील मुलींना शिक्षणासाठी सोमेश्वर परिसरात यावे लागते मात्र संध्याकाळी घरी जाण्यासाठी खूप उशीर होत आहे असे देखील काही विद्यार्थी प्रवाशांनी आमच्याशी बोलताना सांगितले. निरीवरून येताना एसटी बस मध्ये वीस ते पंचवीस प्रवासी अगोदरच बसलेले असतात त्यामुळे सोमेश्वर बस स्थानकावर ती आलेल्या एसटी बस मध्ये थोडेच विद्यार्थी घेऊन बस निघून जाते त्यामुळे दुसरी बस येईपर्यंत बसची वाट पहावी लागते व त्यामुळे घरी जायला देखील उशीर होत आहे आणि याचा मोठा परिणाम अभ्यासावर देखील होत आहे.
पास काढल्यामुळे दररोज खाजगी जीपने प्रवास करणे परवडणार नाही त्यामुळे प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या या मागणीकडे वेळीच लक्ष देऊन विद्यार्थ्यांची अडचण सोडवावी.